Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०
स्वाभिमानी च्या मुक्काम मोर्चामध्ये रेकोर्ड ब्रेक शेतकऱ्यांची उपस्थिती.
दोन दिवसात न्याय न मिळाल्यास आंदोलन आणखी तीव्र करणार - प्रशांत डिक्कर
संग्रामपुर(उमेश राजगुरे )दि.२२ या वर्षी सतत पाऊस सुरु राहल्याने संग्रामपुर ,जळगाव तालुक्या सह संपुर्ण जिल्ह्यात पिकांचे १००% नुकसान झालेले आहे. उडिद, मूंग, कापूस, सोयाबीन, मक्का, ज्वारी सह ईतर पिक सडुन गेले आहे. शेतीला लागलेला खर्च ही भरून निघत नाही, हि परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारला वारंवार सांगुनही सरकारने दखल घेतली नाही. सरकारची अजुनही नुकसान भरपाई देण्याची कोणतीही घोषणा नाही. सगळे नेते, मंत्री , मुख्यमंत्री हे फक्त मराठवाड़ा आणि पश्चिम महाराष्ट्र दौरे करत आहेत. विदर्भात कोणताही नेता. मंत्री फिरकुन पहायला तयार नसल्याने स्वाभिमानी विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात काल २१ रोजी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संग्रामपुर बस स्टँड ते तहसील कार्यालय येथे मुक्काम मोर्चा काढण्यात आला. मोर्चा तहसील वर धडकताच मोर्चेक-यांनी घोषणांनी परिसर दनानुन सोडाला. शेतकऱ्यांना १००% नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, ओला दुष्काळ जाहिर झालाच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
तहसील सामोर मान्यवरांची भाषण झाली या मध्ये ओला दुष्काळ जाहिर करुण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, सर्व पिकांना १००% पिक विमा जाहिर करुण, आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, मागील वर्षी ऑनलाइन नोंदणी केलेल्या मक्का उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये अनुदान द्यावे, कर्ज माफी न झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमुक्त करा. अशा मागण्या या वेळेस करण्यात आल्या. जोपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही, तो पर्यंत तहसील कार्यालयावर मुक्काम करणार असल्याचा ईशारा या आंदोलनातुन देण्यात आला.
मुक्कामी आलेल्या मोर्चातिल शेतकार्यांची राहायाची, जेवायची आणि झोपायची व्यवस्था करायला सरकारला भाग पाडल. या मुक्काम मोर्च्या मधे प्रशांत डिक्कर यांनी आपल्या भाषनातून सरकारवर कड़ाडून टिका करत, आपला रोष व्यक्त केला. जर का सरकार ने दोन दिवासाच्या आत आंदोलनाची दखल घेतली नाही तर संपुर्ण विदर्भात आंदोलन अधिक तिव्र करण्यात येईल असा ईशारा प्रशांत डिक्कर यांनी या वेळेस सरकारला दिला आहे. संग्रामपुरात निघालेला ह्या मुक्काम मोर्चामधे शेतक-यांची रेकार्डब्रेक शेतक-यांची उपस्थिती असल्याने हा ऐतिहासिक मोर्चा निघाला असल्याचे बोलल्या जात आहे.
या मोर्चा मध्ये युवा ज़िल्हाध्यक्ष अनंता मानकर, रोशन देशमुख, उज्वल चोपड़े, विठ्ठल महाले, सैय्यद बाहुद्दीन,कैलास ठाकरे, विलास तराले, योगेश मूरुख, प्रशांत खोड़े, शिवदास खिरोडकर, तेजराव लोने, समाधान धुर्दे, प्रविन येनकर, आशीष नांदोकार, सुनील अस्वार, सूपड़ा सोनोने, नयन इंगळे, स्वप्निल भगत, गोकुल गावंडे यांच्या सह हजोरोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गंगापूर येथील आदिवासी जमीन गैर-आदिवासी व्यक्तीला बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा