Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०
तर...पत्रकारिता करणाऱ्या शिक्षकांच्या नोकरीवर गडांतर. !
शासन मान्य अनुदानीत अथवा खाजगी शिक्षण संस्थेत,(शासनाकडून अनुदान घेत असलेल्या)अनुसूचित जाती,जमातीच्या आश्रमशाळेत,जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी करीत असलेल्या शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोणत्याही वर्तमान पत्रात अथवा इलेक्ट्रॉनिक मिडीयात पत्रकारिता करता येणार नाही.
असे शासनाचे परिपत्रक असतांना अनेक कर्मचारी त्या परिपत्रकाला फाट्यावर मारून सर्रास पत्रकारिता करताहेत . हि बाब काही शिक्षण संस्थाचालक व शिक्षणाधिकाऱ्यांच्या लेखी निदर्शनास आणून दिल्यामुळे अनेक शिक्षकांच्या नोकऱ्यांवर वा पत्रकारितेवर गडांतर आले आहे.
अनेक शिक्षक कर्मचारी पत्रकारिता करित असल्याने त्यांचे लक्ष पत्रकारितेकडे जास्त आणि विद्यार्थ्यांकडे कमी. यामुळे त्याचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे.अनेक जिल्ह्यांमध्ये तर 'शिक्षक कम पत्रकार 'त्या - त्या जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांशी आपले हितसबंध व मैत्री करून पत्रकारिता करीत आहेत.
बऱ्याच ठिकाणी तर शिक्षणाधिकाऱ्यांची या पत्रकार शिक्षकांच्या असल्या उद्योगांना मूकसंमती म्हणा किंवा अभयाश्रय असल्याखेरीज हि शिक्षक मंडळी एव्हढे धारिष्ट्य करूच शकत नाही.
असेहि आता खुलेआम बोलले जावू लागले आहे. जर हे प्रकार शिक्षणाधिऱ्यांकडून थांबविले गेले नाहीत तर त्या- त्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या अंगाशी हे प्रकरण आल्याशिवाय राहणार नाही.
व त्यांच्या मागे देखील चौकशीचा ससेमिरा लागू शकतो.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा