Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २६ ऑक्टोबर, २०२०
चिंचपूर (बु) येथे विजयादशमीच्या मुहर्तावर, 101वृक्षांचे रोपण ! ! !
परंडा (राहूल शिंदे)दि.26 तालुक्यातील चिंचपूर (बु) येथील युवकांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर असलेल्या लाॅकडाऊन काळाचा चांगला फायदा घेत,यावर्षीचा नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करत,गावाच्या विकासाचा विचार करून स्वच्छते सोबतच वृक्षारोपणाचा संकल्प करून.
कोरोनाच्या संदर्भाने लॉकडाऊन असताना संकटाचे सुवर्णसंधीत रूपांतर करून गावच्या तरूणाईने सकारात्मक आणि सर्जनशील कार्य केले आहे. गावचा ऐतिहासिक वारसा असलेल्या गुगळाई माता मंदीर परिसरात विजया दशमीच्या मूहर्तावर 101 झाडांची लागवड केली. व लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्यासाठी गुगळाई मंदीर ट्रस्टच्या वतीने झाडे व पाईपलाईन,भगवान बोबडे यांनी 1000 लीटर पाणी क्षमता असणारी टाकी भेट दिली तर डॉ. महेश देवकर यांनी प्रत्येक झाडासाठी ठिबकसिंचन सुविधा उपलब्ध करून दिली.वनराईचे जतन करण्यासाठी जि.प.शिक्षक अतुल देवकर यांच्या संकल्पनेतून अनावश्यक खर्च टाळून, खैरी तीरावर वसलेल्या गुगळाई माता मंदीर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले "स्वच्छ गाव, हरित गाव" ही संकल्पना राबवण्यासाठी वृक्षारोपण करून इतरांना आदर्श निर्माण करून दिला आहे.
याबद्दल सर्व तरुणांचे कौतुक होत आहे.यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य डॉ.महेश देवकर,अमर देवकर,गणेश जाधव,केशव देवकर,अतुल देवकर,रविंद्र देवकर,अमोल देवकर,सुनिल सोनार, बुवासाहेब देवकर, भगवान अनभुले,भारत रुईकर, आजिनाथ देवकर,गोकुळ तळेकर,संजय देवकर,मच्छिंद्र अनभुले,गोरख अनभुले उपस्थितीत होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा