Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०
नंदुरबार जिल्हा परिषदे समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार..!
नंदुरबार(प्रतिनिधी) जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका ह्या दि.11नोव्हेंबर 2020 पासून नंदुरबार जिल्हा परिषदे समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत याबाबत त्यांच्या आंदोलनातील प्रमुख मागण्या मार्च 2020 पासून सेविका व मदतनीस यांचे अम्रूत आहार योजनेचे आहार शिजवण्याचे 500 रू प्रमाणे ताबडतोब द्यावेत.अमृत आहार योजनेचे पेकिंग केल्यानंतर वाहन भाड्याने करून अम्रूत आहार योजनेचे साहित्य अंगणवाडी केंद्रा पर्यत नेले आहे त्या वाहनाचे थकीत भाडे ताबडतोब देण्यात यावेत.
कोरोना पार्श्वभुमीवर अंड्यांच्या किमती वाढल्या असून त्या पार्श्वभूमीवर अंडे एवजी त्या किमतीएवढे ऋतु मानानूसार फळे उपलब्ध करून देणे बाबत आदेश काढण्यात यावा.
अमृत आहार योजनेचे ऑडीट करण्याची सक्ती रद्द करन्यात यावी.मोबाईल दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आलेले 2500 रु पर्यत ची रक्कम अंगणवाडी कर्मचारी यांना दिवाळी पूर्वी देण्यात यावी.कोरोना 2019 मध्ये घरोघरी जाऊन कोरोनाबाबत जनजाग्रुती करणे स्वच्छता मोहिम राबविणे ई.कामे करत असतांना कोरोनाची लागण झालेल्या व म्रुत्यु पावलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी यांना शासन आदेशानुसार 50 लाख रु ईतकी रक्कम त्यांच्या वारसाना देण्यात यावी.
आयुक्त नवी मुंबई यांचे दि.2 नोव्हेंबर 2020 च्या आदेशानुसार 2020 ची उन्हाळी सुटी ताबडतोब मंजूर करण्यात यावी या व ईतर मागण्यांसाठी 11नोव्हेबर 2020 पासून जिल्हा परिषदे समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
नोव्हेबर 2020 चे अमृत आहार योजनेचे पैंकींग केलेले कोणतेही अन्न धान्य मीट मसाला अंडी केळी वाटप करू नये व कोणत्याही दबावाला बळी पडू नये असा इशारा कार्याध्यक्ष युवराज बैसाने यांनी दिला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा