Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२०
वडाळी खैरवे रस्त्यावर अज्ञात इसम मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ..!
तोरखेडा प्रतिनिधी:बाबू मण्यार: शहादा तालुक्यातील वडाळी - खैरवे रस्त्यालगत असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या कापसाच्या शेतातील विहिरी जवळ पिंपळाच्या झाडाखाली बेवारस अवस्थेत पुरुष जातीचे अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सदर घटनेची वडाळी ता.शहादा येथील पोलीस पाटील गजेंद्रगिरी गोसावी यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात खबर दिली असता. घटनास्थळी पोलिसांनी हजेरी लावत घटनेचा पंचनामा केला.
सदर मयत व्यक्तीचे नाव गाव माहीत नसल्याने ओळख पटली नाही. मयत इसमाचे अंदाजे वय 47 असून वर्णन बांधा सडपातळ,उंची पाच फूट,रंग सावळा,डोक्याचे केस काळे, दाढीचे केस वाढलेले व सफेद, अंगावर लाल रंगाचे फुलबाहीचे शर्ट व राखाडी कलर चे स्वेटर तर उजव्या हातावर ओम ,जय भिम ,तसेच HS ,AS असे गोंधलेले आहे.
तरी सदर इसमाची ओळख पटल्यास सारंगखेडा पोलिसांची त्वरित संपर्क साधावा असे आवाहन सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरसाठ यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा