Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
साखर कारखान्यास ऊसतोड कामगारांचा पुरवठा करण्याचे..! अमिश दाखवत सात लाखात गंडविणाऱ्यास दोघांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!
साखर कारखान्यास ऊसतोड कामगारांचा पुरवठा करण्याचे..! अमिश दाखवत सात लाखात गंडविणाऱ्यास दोघांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!
शिरपूर (प्रतिनिधी) साखर कारखान्यास ऊसतोड कामगारांचा पुरवठा करण्याचे आमिष दाखवून करारनामा करीत ६ लाख ९० हजार घेऊन ही मजूर पुरवठा न करणाऱ्या शिरपूर तालुक्यातील चांदपुरी व निमझरी येथील दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ठेकेदार मानसिंग मारुती काळे रा.नावली ता.पन्हाळा जि. कोल्हापूर याने कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील उदयसिंग गायकवाड सहकारी साखर कारखान्यात ट्रॅक्टर भाड्याने लावले होते.ऊस तोडणीसाठी फिर्यादीला ऊस तोडणी मजूरांची गरज होती.त्यासाठी त्यांनी शिरपूर तालुक्यातील निमझरी येथील नामदेव मोतीराम भिल या ऊसतोड मजूराशी संपर्क झाला.त्यानंतर त्याने चांदपुरी येथील कमलसिंग भिल याचेशी भेट घालून दिली दोघांनी मजूर पुरविण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर वकिलामार्फत करारनामा लिवून घेत २३ जोडी (४६ मजूर)चे प्रत्येकी ३० हजार प्रमाणे ६ लाख ९० हजार रुपये रोख स्वरूपात घेतले हा करार १२ सप्टेंबर २०२० करण्यात आला होता.दि.२नोव्हेंबर रोजी प्रत्यक्षात मजूर घेण्यासाठी तक्रारदार संशयितांकडे आले तेव्हा तक्रारदारास मजूर देण्यास नकार दिला तसेच तुमचे पैसे पण देत नाही व मजूर पण देणार नाही तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या अशी धमकी दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आल्याने दि.५ नोव्हेंबर रोजी रात्री त्याने थेट पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली.
दिलेल्या फिर्यादीवरून नामदेव मोतीराम भिल रा.चांदपुरी व कमलसिंग रमण भिल रा.निमझरी ता.शिरपूर यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शिरपूर शहर पोलीस करीत आहेत
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
माधव खाबिया नाशिक - आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा