Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

महाविकास आघाडीची,औरंगाबाद पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, कळंब येथे सहविचार सभा संपन्न...



कळंब (राहूल शिंदे) दि.7 येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीच्या अनुषंगाने मराठवाडा पदवीधर मतदारसंघऔरंगाबाद, सहविचारी आयोजित सभेस खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर उपस्थित राहुन प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, कार्यकर्ते व पदवीधर मतदारांशी संवाद साधण्यात आला.यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक व परीक्षा आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची व्याप्ती मोठी असल्याने उमेदवार पोहचेलच असे नाही. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपण उमेदवार समजून एकदिलाने काम करावे. आपल्या उमेदवारांस भरघोस मतांनी निवडून देऊन महाविकास आघाडीची ताकत वाढवावी. असे आवाहन कार्यकर्त्यांना व पदवीधर मतदारांना केले.

या कार्यक्रमास महाविकास आघाडीचे उमेदवार आ.सतिष चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळंब- धाराशिव (उस्मानाबाद) विधानसभा मतदारसंघाचे आ.कैलास घाडगे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जिवनराव गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, संजय निंबाळकर,नरेंद्र काळे,बाळासाहेब पाटील, प्रतापसिंह पाटील,पांडूरंग कुंभार,श्रीधर भवर, शिवाजी कापसे, श्याम खबाले, प्रा.संजयजी घुले, प्रताप मोरे, प्राचार्य डॉ. सुनिल पवार, नितीन बागल, शिवाजी लकडे, भागावत धस,भास्कर खोसे,दिलीपसिंह देशमुख आदी उपस्थिती होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध