Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०
अतिवृष्टीने त्रस्त शेतकरी बाप......
राज्यात व देशात कोरोना संसर्गजन्य रोगाने खूप धुमाकूळ घातला आहे.ते कमी की काय म्हणून परतीच्या मान्सूनने उरले-सुरले हिरावून घेतले खूप मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले.त्याचं स्थितीचे वास्तववादी वर्णन केलेले आहे.शिवव्याख्याते प्रमोद भोंग यांनी.
आभाळ कोसळलं अतिवृष्टी झाली
धो - धो पाऊस पडला.
ओढा भरला ,नदीला पूर आला, पाणी बघायला गाव जमा झाला.
मी सर्वांच्या सोबत एक हळूच सेल्फी घेतला..
सर्वांच्या नजरा भरल्या रानाकडे गेल्या
सगळं काही वाहून गेलं
कुणाचं सोयाबीन गेलं तर कुणाचं कांद गेलं.
सोयाबीन कांद्याबरोबर लोकांची
स्वप्ने सुद्धा वाहून गेली....
पाणावलेल्या डोळ्यांनी
मी शेताच्या बांधावर हात बांधून उभा राहिलो तेव्हा पाहिलं तर ....
सगळं काही वाहून गेलं होतं माती सुद्धा राहिली नाही..
राहिला फक्त शेतकरी बाप
पुन्हा मातीत राबायला मरायला.....
पाऊस पडून दोन दिस झाले,
कागदी घोडे नाचू लागले ...
टीव्हीवाले, पेपरवाले, ओरडु लागले....
माय बाप रडू लागले
तेंव्हा कुठे सरकार जागे झाले.
आमदार ,खासदार, मंत्री ,बांधावरती आले ...
अधिकाऱ्यांना आदेश दिले पंचनामे झाले.
पारावरती लोकांची गर्दी झाली,
चर्चा रंगू लागली..
आता अनुदान मिळणार ,,
दिवाळी साजरी होणार......
अनुदान नाही मिळालं,,मदत ही नाही
दिवाळी ही नाही झाली...
पिकाबरोबर शेतकरी बापाच्या आयुष्याची होळी मात्र झाली..
मी पुन्हा शेताच्या बांधावर आलो
तेव्हा,,शेतकरी बाप
मातीत राबत होता
घाम गाळत होता
पुन्हा त्या क्रुर नीतीशी लढत होता...
विस्तवाचे चटके सहन करत जगण्याची लढाई लढत होता.
=================
कवी:- शिवव्याख्याते प्रमोद भोंग,बार्शी
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा