Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
धुळे नंदुरबार विधान परिषद भाजपाचे उमेदवार माजीमंत्री अमरिशभाई पटेल यांना विजयी करावे..! बबनराव चौधरी..!
धुळे नंदुरबार विधान परिषद भाजपाचे उमेदवार माजीमंत्री अमरिशभाई पटेल यांना विजयी करावे..! बबनराव चौधरी..!
शिरपूर : धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची दि. १ डिसेंबर २०२० रोजी पोट निवडणुक होत असुन या मतदार संघात विकासाचे व्हिजन असलेले भाजपाचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांच्या पाठिशी मतदारांनी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य तथा नंदुरबार जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी यांनी प्रसिध्दी पत्राद्वारे केले आहे.
यापुर्वी देखील माजीमंत्री अमरीशभाई पटेल यांनी विधान परिषद सदस्य म्हणुन उत्तम कामगिरी केली आहे ते सतत विकासाचे व्हिजन डोळ्या समोर ठेवुन काम करीत असतात या आधी धुळे नंदुरबार या दोन हि जिल्ह्यात विकास कामे करीत असतांना त्यांनी कधीच पक्षपातीपणा केला नसल्यामुळे माजीमंत्री अमरीशभाई पटेल यांना प्रचंड पाठींबा मिळत आहे.
धुळे - नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदार संघातून महाराष्ट्र विधान परिषदेची पोट निवडणूक होत असुन या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी भाजपाचे उमेदवार माजीमंत्री अमरीशभाई रसिकलाल पटेल यांना आपला पसंतीक्रम 1 देऊन प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहान महाराष्ट्र भाजपा प्रदेश सदस्य तथा नंदुरबार जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा