Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

कनिष्ठ अभियंता दत्तात्र्य दसपुते यांची, सहाय्यक अभियंता पदी पदोन्नती....


परंडा (राहूल शिंदे) दि.7 तालुक्यातील शेळगाव येथील वीजपुरवठा करणाऱ्या 33/11 विद्युत सबस्टेशन येथे दोन वर्षांपासून कार्यरत असणारे कनिष्ठ अभियंता दत्तात्र्य दसपुते यांची पदोन्नती सहाय्यक अभियंता पदावर झाली असून त्यांची नेमणूक कडा ता.आष्टी येथे झाली आहे.या नवनियुक्तीबद्द्ल व शेळगाव येथील कार्यकाळात उल्लेखनीय कारकिर्दीबद्दल चिंचपूर (बु) येथे त्यांचा नागरी सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या,

यावेळी,माजी उपसरपंच महादेव शिंदे,पं.स सदस्य सतीष देवकर, शेळगावचे कनिष्ठ अभियंता शेखरसिंग राजपुत, वरिष्ठ तंत्रज्ञ गोकुळ डोके,तंत्रज्ञ बालवीर शिंदे, डी.वाय ऑपरेटर औंढकर एन.जे आदी यावेळी उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध