Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२०

कोरोना काळातील ड्युटीचा अनुभव..! दिपक सुमन पंडीत साटोटे..!


कोविड १९ स्टाफ नर्स (अधिपरीचारक )
कोविड सेंटर जिल्हा रुग्णालय नंदुरबार


कोरोना १९ नाव जरी ऐकल तरी भीती आणि अंगावर शहरे आणणारा महाभयंकर रोग त्या कोरोना सारख्या महामारीत आपल्या आरोग्य शिक्षणाचा पुरेपूर फायदा लोकांच्या आरोग्यसेवेसाठी व्हावा या दृष्टीने जीवाची पर्वा न करता जबाबदारी सांभाळताना भीती असायची व डोळ्यात अश्रूंचा पांझर फुटायचा पणं नर्सिंग क्षेत्रात शिक्षण घेतांना घेतलेली आरोग्य सेवेची शपथ अंगातील सळसळत्या रक्तात नवी उमेद निर्माण व्हायची आणि कामाला उमंग यायचा. खर तर स्टाफ नर्स म्हणजे परिचारीका असा नावाचा उल्लेख कित्येक लोकांना अजूनही माहीत नाही फक्त ब्रदर आणि सिस्टर अशी सोपी ओळख लोकांच्या मनात जिवंत आहे त्याचप्रमाणे कर्तव्य करतांना रुग्णांच्या सानिध्यात रहायचा जास्त योग आमचाच येतो याची तमा न बाळगता रुग्णांच्या हाव भाव आणि स्वभावाची जाणीव ठेवून कार्य करणे वाटते तेवढे सोपे नव्हते पणं आपल्या गोड वाणीने परका ही आपला होते अश्या मानसिक धारणेने रुग्णांच्या सहवासात असायचो. आणि नर्स म्हणून मला  याची खात्रीशीर जाणीव होतीच.
     
प्रथमतः कोविड नर्स म्हणून कर्तव्य बजावतांना कोणत्याही रुग्णाला आपल्या मुळे त्रास होऊ नये आणि रुग्णांच्या आक्रोशाने आपल्याही मनावर भावंनेच ओझ होऊ देऊ नये याची पूर्व तयारी आधीच केली होती म्हणून कधीही कोणत्याही रुग्णाचा त्रास मलाही जाणवला नाही. रुग्ण व नातेवाईक यांच्या मनातील भीती नाहीशी करताना समुपदेशन महत्वाचे असायचे. योगा उच्च श्वासोच्छवास घेणे रुग्णासाठी फायद्याचे होते ,डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्ही वेळेवर योग्य औषधोपचाराचा पाठपुरावा करणे आणि रुग्णांना देणे आमचे आद्य कर्तव्य. कोविड रुग्णांशी हितगुज करतांना त्यांना आपल्या क्षमतेने मानसिक आधार देणे, होणारा त्रास पध्दतशीर जाणून घेतल्याने खऱ्या माणुसकीचे लक्षण दिसायचे आणि मनाला या कर्तव्याचा अभिमान वाटायचा.
     
अनेकदा म्हातारं रुग्ण माणसं शी संवाद साधताना अडचणी यायच्या , जोर जोरात सांगावे लागायचे ऑक्सीजनची नळी काढून घायचे त्यामुळे रूग्णांना धोका असण्याची शक्यता उद्भभवयाची ,ते ऑक्सिजन ची नळी पुन्हा पुन्हा लावणे आमचा नित्य क्रम, अशा अनेक गोष्टी वयस्कर रुग्णांच्या आम्हाला कराव्या लागत उदा. हात धरून उठवणे , बाथरूमला घेऊन जाणे, वेदना जाणून घेणे कपडे बदलण्यासाठी सहकार्य ,कारण केल्याने होते रें आधी केलीच पाहिजे, त्यांच्या अडखळत शब्दांतून अनेक आशिर्वाद, प्रेरणा आम्हाला मिळत होत्या. आई वडिलांची सेवा करण्याचा हा आगळा वेगळा क्षण सातत्याने आठवायचा त्यामुळे रुग्णांशी परस्पर नात जुळायच व आम्ही सांगितलेलं पथ्ये रुग्ण तेही योग्यरीतीने पाळायचे ,आरोग्य सेवा देताना  पी पी ई किट मुळे शरीरातून घामच्या धारा लागत, त्या घामाला सुध्दा कर्तव्याचा सुगंध होता डोळ्यांना भुरसट दिसायचे तरी प्रयत्न मात्र अतोनात असायचे.
     
अशा अनेक आठवणी या कोरोना काळात स्मरणात राहिल्यात ,काही रुग्ण माझ्यासारख्या ची वाट बघतच राहायचे की हे ब्रदर सिस्टर केव्हा येतील कारण स्टाफ भरुपुर असतात पणं आपल्या आपुलकीचा जिव्हाळा फार काही लोकांकडे असतो. काही कारण लोक आक्षेप पणं घेत कारण पी पी ई किट मध्ये आम्ही नेमक कोण याची ओळख त्यांना उमजत नसे, लोकांची भेट ही योगा योगाने जुळून येते याची खास सहानुभूती त्यांच्या उत्सुकते मध्ये दिसायची आणि आम्ही समोर दिसल्या वर प्रसन्न चेहरा फार काही सांगायचा म्हणून हा अश्रू रुपी आनंद क्षण आयुष्याला आणि माझ्यातून निघणारी आरोग्य सेवेला कलाटणी देणारा ठरला.
        
जागतिक महामारी असलेला कोरोना कित्येक लोकांचे आयुष्य उध्वस्त करून तर काहींना पोरका करुन गेला त्यात महत्वाचे म्हणजे मानवाला माणुसकी शिकवून गेला. अनेक नकारात्मक गोष्टी घडत असताना मानवाने सकारात्मक शक्तीचा शोध घेणे आणि त्यातून माणुसकी धर्माचा बोध घेणे अनिवार्य झाले. मानवाच्या स्वार्थी आणि निःस्वार्थी प्रजातीतून भरपूर मदत गोर गरिबांना मिळाली अशी वाक्ये रुग्णांच्या तोंडून ऐकायला मिळायची पणं रुग्णालयात मात्र त्यांना डॉक्टर नर्स हा प्रमुख साथीदार असायचा. पण  आय सी यू मध्ये रुग्णांची काळजी घेणं वाटतं तेवढं सोप्प नव्हते. जनरल मध्ये रुग्णांना समजावून सांगताना अनेक विचार डोक्यात यायचे पणं रुग्ण सेवेचा ध्यास अर्थातच ईश्वर सेवेच्या बरोबर होता अशा अथांग प्रयत्नांतून  जेव्हा रुग्ण बरे होऊन घरी जात आणि  हृदयाला समाधान व्हायचे आणि मनाला अत्यानंद निश्चितच.
        
जेव्हा पेशंट बरोबर त्याची पुरेपूर काळजी घेऊन दगावल्याची घटना घडायची ते खंत म्हणून मनात साठवून राहिले मात्र अनेक वेदनांवर विजय मिळवून खुशीने घरी जाणारे रुग्ण आमची ताकद वाढवून जायचे आणि जातांना प्रेमाचे आपुलकीचे शब्द पणं देत,जेव्हा अत्यंत गंभीर रुग्ण आला तेव्हा नातेवाईकांनी केलेल्या विनवण्या आणि आमची होणारी धडपड प्राण वाचवण्यासाठी केलेली कसरत माझ्या कर्तव्याला इतिहास बनवून गेली,  जेव्हा जेव्हा रुग्ण आणि नातेवाईक हात जोडत म्हणत तुम्हीच देव रूप तेव्हा वाटे की प्रत्येक माणसाचा जन्म काहीतरी खास करण्यासाठी झालेला असतो. 

कारण जेव्हा लोक मरणाला घाबरतात साधं स्पर्श पणं करत नाही तेव्हा नर्स म्हणून त्या रुग्णांची काळजी घेण्याचं धाडस आमच्यात होत हे सिद्ध झालं आणि स्टाफ नर्स असल्याचं मानसिक समाधान मिळालं त्यामुळे हा खरा खुरा अनुभव मला जीवनाला ऊर्जा प्रदान करणारा ठरला. त्या सर्व रुग्णांचे आभार ज्यांच्यामुळे आमच्यातला आरोग्यसेवक आरोग्य दूत जन्माला आला. अशा कित्येक आठवणी अविस्मरणीय घडत त्यात जीवनाची सकारात्मकता शोधून हा छोटा लेख प्रपंच निर्माण झाला..



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध