Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ४ मे, २०२६

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू.




बापू चव्हाण दिंडोरी

       विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये विद्युत ताराबद्दलभीतीचे वातावरण पसरले असून वीज कंपनीने तातडीने विद्युत तारांच्या भोवती प्लास्टिक आवरण बसवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
           दिंडोरी गांधीनगर येथे विद्युत तारांचे प्रचंड जाळे आहे.परवापासून वातावरणात बदल झाला असून हवा वाहत आहे थोड्याफार प्रमाणात वादळ पण निर्माण होत आहे आज सकाळपासून वारा वाहत असल्याने तारा सुद्धा हलत होत्या दिंडोरीतील टावर गल्ली येथे हरी पुंजा गायकवाड वय (४५) हे घराच्या टाकीवर साफसफाई करण्यासाठी गेले तेथे काम करीत होते त्या टाक्यांवरून व घरावरून १३२ केवी ची विद्युततारांचा प्रवाह गेलेला आहे. हवा असल्याने तारा झुरत होत्या याच तारांच्या प्रभावात आल्याने हरिभाऊ घराच्या छतावरून खाली पडले व ते मृत झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.विद्युत प्रवाह व तरंगांचा प्रभाव इतका भयानक होता की ते भिंतीवर आदळले. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात त्यांना आणले असता डॉ.काळे यांनी मृत घोषित केले.पोलिसा हवालदार प्रवीण शिंदे यांनी पंचनामा केला वीस कंपनीचे शाखा अभियंता नागरे साहेब व महेंद्र पैठने यांनी प्रत्यक्ष येऊन तारांची पाहणी केली व मयत हरिभाऊ यांच्या कुटुंबीयांचे सातवन केले.दरम्यान गांधीनगर येथील सर्व विद्युत तारांचे जाळे हे भूमिगत करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी शासनाकडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध