Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १ मे, २०२६

बिल मंजुरीसाठी लाच मागणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याला रंगेहात पकडला


🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० रोजी केलेनगर येथे सापळा रचून रंगेहात पकडले
.
🟥 संबंधित कामाचे सुमारे १२ लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे सुमारे ७ टक्के प्रमाणे ८४ हजार रुपयांची मागणी केली होती. यापूर्वीच त्याने काही रक्कम ऑनलाईन माध्यमातून स्वीकारली होती.


🟧 तक्रारदाराने याबाबत ACBकडे तक्रार दाखल केल्यानंतर पथकाने सापळा रचला. केलेनगर येथील निवासस्थानी तडजोडीअंती ५० हजार रुपये स्वीकारताना पवार यांना रंगेहात पकडण्यात आले.

🟩 ही कारवाई डीवायएसपी योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ACB पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

🟦 दरम्यान, आरोपी अधिकाऱ्याला किडनीचा आजार असल्याने तो नुकताच डायलिसिस करून आला होता. त्यामुळे त्याला तात्काळ अटक न करता नोटीस देण्यात आली असून, पुढील कारवाई सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध