Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०
भोई समाज शिष्टमंडळाची पीडित सूर्यवंशी परिवाराला सात्वंन भेट
नादुरा शहर (उमेश राजगुरे)दि.2 येथील स्व. राजारामजी सुर्यवंशी यांचा ह्दय विकारानी अकास्मीक मृत्यु झाला.त्यांच्या कुटुबांला त्याच्या घरी जाऊन भेट देण्यात आली, त्यांची हालाकीची परिस्थितीती खुप नाजुक असुन त्यांना एक मुलगा आहे तो शिक्षण घेत आहे. त्यांचा घरातील आधार गेला.
सात्वन भेट म्हणून निषाद पार्टी विदर्भ अध्यक्ष विजय साटोटे भोनगाव, भोई समाज युवा मंच अमरावती विभागीय अध्यक्ष निलेश साटोटे खामगाव, भोई समाज युवा मंच अमरावती विभागीय सचिव उमेश राजगुरे शेगाव, अॅड.निलेश सातसुरे नांदुरा, राजेश भामोद्रे माजी सरपंच कुरकुंडी, सुरेश बावणे म.पो. एस आर पी एफ , नांदुरा, अशा प्रकारे शिष्ट मंडळ यांनी त्याच्या घरी जाऊन सांत्वन भेट देण्यात आली.
मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आ. राजेश एकडे यांना भोई समाजातील समाज सेवकांनी माहिती दिली. त्यावेळी आमदारांच्या पीएला फोन करण्यात आला, निशांत मराठी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलीप घट्टे, तसेच निषाद पार्टी विदर्भ अध्यक्ष विजय साटोटे, भोई समाज युवा मंच अमरावती विभागीय सचिव उमेश राजगुरे यांनीसुद्धा समाज बांधवांच्या आर्थिक परिस्थिती बद्दल जाण करून दिली आणि सात्वन भेट देण्याकरिता सांगितले आसता आ. राजेश एकडे काल दि.1 सायंकाळी 7-8 च्या दरम्यान पीडिताच्या घरी सांत्वनभेट मदतीसाठी आश्वासन दिले .
आमच्या समाजबांधवांची परिस्थिती खूप नाजूक आहे आणि घरचा कर्ता पुरुष हृदयविकाराच्या झटक्याने सूर्यवंशी परिवारातून निघून गेला. त्यांचा व्यवसाय फळ फ्रुट भाजीपाला विकून परिवाराचा उदरनिर्वाह चालवत असे . त्यांचा मुलगा शिक्षण घेत असून वडिलाला हातभार लावत असे. दसऱ्याच्या दिवशी त्यांच्या छातीमध्ये जळजळ होत होती त्यांनी सिल्वर सिटी हॉस्पिटल ला दाखल करण्यात आले तेथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला. अशा परिस्थितीमध्ये सिल्वर सिटी हॉस्पिटलचे बिल पे करण्याकरिता त्यांच्याकडे पैसे नव्हते. आणि हॉस्पिटल स्टॉफ बॉडी त्यांच्या ताब्यात देण्यास तयार नव्हते .काही परिवाराकडून त्यांनी हात उसने पैसे घेतले. आणि पैसे पे करून प्रेत ताब्यात घेतले. घरावर सुद्धा कर्ज काढलेले आहे.
विविध विषयावर चर्चा करण्यात आली.आणि हा विषय आपल्या सर्व समाज बांधव या पर्यंत आम्ही पोहोचू हे सूर्यवंशी परिवाराला आम्ही शब्द दिला आणि समाज बांधवांनी कडून जे काही आर्थिक मदत होईल ते आम्ही कारण्याचा प्रयत्न करू असे सांगण्यात आले.
शेवटी समाज बांधव या नात्याने आम्ही आमदार यांचे आभार मानतो की आमच्या शब्दाला मान देऊन त्याच्या घरी सांत्वन भेट दिली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा