Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०
शासनाच्या हमीभावानुसार कापूस खरेदी करा, अन्यथा तीव्र आंदोलन -स्वाभिमानी.
विभागीय व्यवस्थापक.महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या.विभागीय कार्यालय खामगाव कार्यालय शेगाव जिल्हा बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले.
शेगाव तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाची शासकीय हमी भावाप्रमाणे कापूस खरेदी करण्यासाठी कापूस पणन महासंघाने शेगाव येथे तत्काळ कापूस खरेदी केंद्र सुरू करावे. तालुका कापूस उत्पादनात अग्रेसर असल्याने यावर्षी देखील तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड झालेली असून. कापसाचे पीक चांगल्या प्रकारे आहे.
सणासुदीचे दिवस असल्याने आपल्या आर्थिक आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या कापसाचे खुल्या बाजारात खाजगी व्यापाराकडे 30ते35 रुपये किलो प्रमाणे विक्री करावी लागत आहे. खाजगी व्यापारी कमी भावात शेतकऱ्यांच्या कापसाची खरीदी करीत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. तरी शासकीय हमी भावाप्रमाणे खरीदी झाल्यास शेतकऱ्यांची खाजगी व्यापाऱ्याकडून होणारी लूट थांबनार आहे.
त्यामुळे आपल्या कार्यालयने शेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन शासकीय हमी भावाप्रमाणे कापूस खरेदी करण्यासाठी शेगाव येथे कापूस खरेदी केंद्र सुरु करावी. तसेच शासकीय हमीभावा प्रमाणे कापूस खरेदी केंद्रांवर कापूस विक्री करण्यासाठी संबंधित यंत्रणेमार्फत नोंदणी प्रक्रिया तात्काळ सुरू करावी. अन्यथा आपल्या कार्यालय प्रणालीचा निषेध नोंदविण्या साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहर वतीने.विभागीय व्यवस्थापक.महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित शेगाव या कार्यालयासमोर दिनांक 8/11/2020 रोजी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात कापूस फेको आंदोलन करण्यात येईल याची नोद घ्यावी.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा