Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २ डिसेंबर, २०२०

पदवीधर निवडणूक: शेळगाव येथे 75.45%मतदान


परंडा(राहूल शिंदे) दि. 01 : औरंगाबाद विधानपरिषद पदवीधर मतदार संघासाठी परंडा तालुक्यातील शेळगाव केंद्र क्र. 621 या मतदान केंद्रावर कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेत, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत मतदान करण्यात आले.

त्याच पार्श्वभुमीवर मास्क नसणाऱ्याना मास्क देण्याबरोबरच सुरक्षित अंतराचे पालन करत मतदान करण्यात आले. सर्व मतदारांनी आपला हक्क बजावत, आरोग्य कर्मचारी, मतदान अधिकारी, पोलीस प्रशासन आदींना सहकार्य करत मतदान यशस्वीरित्या पार पाडले.

बुथवर 171 पैकी 129 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे, त्यात 111 पुरुष तर 18 स्त्रिया असून, टक्केवारी 75.45 इतकी झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध