Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ८ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन...
मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन...
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.8 राज्यात 5 ते 6 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावं, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
जालन्यात पत्रकारांशी ते बोलत होते मंत्री टोपे म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात रक्तदानाचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्तसाठ्यावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. सध्या आता पाच ते सहा दिवसच पुरेल एवढाच रक्तसाठा राज्यात उपलब्ध आहे.
राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोट्या- छोट्या रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे. स्वैच्छिक रक्तदात्यांनी देखील नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक त्या तपासणी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना करुन रक्त संकलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना जीवनदान देण्याकरिता सर्वांनी पुढे येऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला लागलीच प्रतिसाद देत ''विश्वजन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य'' यांनी समितीच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त राज्यात ठीक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.असे संस्थापक अध्यक्षा सौ.छायाताई भगत यांनी सांगितले आहे.त्याचाच एक भाग म्हणून ''विश्वजन आरोग्य सेवा समिती धाराशिव जिल्हा'' यांच्या वतीने परंडा तालुक्यातील देवगाव येथे दि.15 डिसेंबर रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी अनमोल असे रक्तदान करून एका गरजू व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या अगोदर देखील देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 15ऑगस्ट रोजी एकाच दिवशी एकाच वेळी राज्यभर विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा