Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ८ डिसेंबर, २०२०
शिवशंभू संघटनेच्यावतीने अंतुर किल्ला येथे, एकदिवसीय गडकोट मोहीम संपन्न....
कन्नड (राहूल शिंदे)दि.8 तालुक्यातील अंतुर येथे आज शिवशंभू संघटनेच्या वतीने एकदिवसीय गडकोट मोहीम महाराष्ट्र राज्य प्रवक्ते संभाजी वरपडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सविस्तर वृत्त असे की,
छञपती शिवरायांच्या व मावळ्यांच्या शोर्याचे प्रतिक असणारे महाराष्ट्रातील गडकोट नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहेत म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून शिवशंभू संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्रातील गडकोट संवर्धन करण्याचा वसा घेतला आहे व महाराष्ट्रातील गडकोट संवर्धन करत आहे. गडकोटामुळे महाराष्ट्राताला ऐतिहासिक वारसा मिळाला आहे, पण तोच ऐतिहासिक वारसा आज पडझड झालेल्या अवस्थेत आहे ज्या छञपती शिवरायांनी अटकेपार झेंडा लावून आखिल हिंदुस्थानाची ख्याती जगभर पसरवली आज त्या छञपती शिवरायांचे गडकोट पडझड व ओसाड झालेले आहेत.
म्हणूनच शिवशंभू संघटना महाराष्ट्रातील गडकोट संवर्धन करण्यासाठी नेहमीच अग्रस्थानी असते त्याचाच एक भाग म्हणून ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली.
यावेळी शिवशंभु संघटना मराठवाडा प्रसिद्धीप्रमुख विकास पाटील नलावडे,संभाजीनगर युवक जिल्हाध्यक्ष विलास पाटील खवणे,उपजिल्हाध्यक्ष संजय पाटील औटे, शिवशंभु शेतकरी आघाडी संभाजीनगर जिल्हाध्यक्ष जानकीराम नलावडे,संभाजी नगर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पिंटू भाऊ तंत्रे,कन्नड तालुका उपाध्यक्ष कैलास पाटील पवार,कन्नड तालुका प्रसिद्धीप्रमुख कल्याण पाटील मीठे,गंगापुर तालुका अध्यक्ष कृष्णा पाटील जगताप,गंगापूर उपाध्यक्ष संतोष गंडे,वैजापूर ता.अध्यक्ष अनिल चव्हाण,वैजापूर उप ता.अध्यक्ष समाधान वाणी,पदाधिकार्यांची व शिवभक्तांची उपस्थिती होती.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा