Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १० डिसेंबर, २०२०

जेकटेवाडी येथील शेतकऱ्यांना, रब्बी हंगामातील हरभरा पिकाचे मार्गदर्शन...



परंडा (राहूल शिंदे)दि.10 तालुक्यातील जेकटेवाडी येथे धोडींबा महादेव तांबे यांच्या शेतामध्ये हरभरा, ज्वारी या रब्बी हंगामातील पिकाचे मार्गदर्शन शेतीशाळा प्रशिक्षक पांडुरंग खटके यांच्या उपस्थितीमध्ये नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प या अतंर्गत शेती शाळा घेण्यात आली.

शेतीशाळामध्ये खटके साहेबांनी 'फेनोमोने ट्रॅप्स ' व हरभरा पिकातील अळया खाण्यासाठी इंग्रजी ' टी ' अक्षराचे पक्षी थांबे तसेच निबोंळी अर्क बनविणे तसेच पाणी व्यवस्थापन, खते कशाप्रकारे पिकांना द्यायची याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी एस.एस. राठोड कृषी सहाय्यक, पोलिस पाटील रविंद्र तांबे, नाना केसकर, शहाजी तांबे , रामा रोमन, गणेश पांडुरंग तांबे, हरीदास खामकर, उद्धव तांबे, आण्णा कदम, दत्ता पवार, सुशांत तांबे, अमर तांबे, जिजाबा तांबे , नेमीनाथ केसकर, सदाशिव लांडे, दादा केसकर, विष्णु तांबे, बाळू जालींदर तांबे, कल्याण तांबे, परमेश्वर तांबे, महादेव तांबे, परमेश्वर तांबे, तुकाराम रोमन, अशोक साबळे, अकुंश केसकर आदीसह गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध