Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १४ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
माजी मंत्री रावल यांच्या फार्महाऊसवर रात्री-अपरात्री महिलांचं येणं जाणं...! अनिल गोटेंचा गंभीर आरोप...!
माजी मंत्री रावल यांच्या फार्महाऊसवर रात्री-अपरात्री महिलांचं येणं जाणं...! अनिल गोटेंचा गंभीर आरोप...!
धुळे प्रतिनिधी:आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात माजी आमदार अनिल गोटे यांनी स्पष्टीकरण देताना आमदार जयकुमार रावल यांच्यावरच उलट आरोप केले आहेत. रावल यांच्या फार्मवर रात्री-अपरात्री महिलांचे येणे जाणे असते, असा गंभीर आरोप गोटे यांनी केला आहे.
माजी आमदार अनिल गोटे यांच्यावर आमदार जयकुमार रावल यांच्या फार्महाऊसवर जाऊन धिंगाणा केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या दोंडाईचा ताकरखेडा येथील फॉर्म हाऊसमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश करुन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी माजी आमदार अनील गोटे यांच्याविरोधात दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार जयकुमार रावल यांच्या टाकरखेडा येथील फार्म हाऊस वर अनिल गोटे आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर प्रवेश केल्या मुळे वॉचमन प्रतापसिंग गिरासे यांनी फिर्याद दिली आहे. यावर माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी स्पष्टीकरण देताना आमदार जयकुमार रावल यांनी आमदार रावल यांच्या फार्महाऊसवर रात्री-अपरात्री महिलांच येणं जाणं सुरू असतंआणि या अनोळखी महिलांना भेटण्यासाठी आमदार जयकुमार रावल फार्म हाऊस वर रात्री-अपरात्री जातात. हे मला कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतर याची पडताळणी करण्यासाठी मी रावल यांच्या फार्महाऊसवर गेलो होतो व त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वाद झाला नसून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे स्पष्टीकरण गोटे यांनी दिले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा