Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
मराठवाडा पदवीधर निवडणूक: आ.सतीश चव्हाण यांची हॅट्रीक, शिरीष बोराळकर यांचा दारुण पराभव....
मराठवाडा पदवीधर निवडणूक: आ.सतीश चव्हाण यांची हॅट्रीक, शिरीष बोराळकर यांचा दारुण पराभव....
औरंगाबाद (राहूल शिंदे) दि.4 मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती यांच्यात अटी-तटीची लढत होईल असा अंदाज होता.मात्र पदवीधर मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पहिल्या पसंतीची 1लाख 16 हजार 638 मते देऊन तब्बल 57हजार 895 मताधिक्याने विजयी करून हॅट्रीक करण्याची संधी दिली.त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना 58 हजार 743 मते मिळाली.
आश्चर्य म्हणजे सर्व पदवीधर असताना देखील तब्बल 23,000पेक्षा जास्त मते अवैध ठरली आहेत.
सर्वच पाचही फेऱ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण आघाडीवर होते.
या निवडणुकीत पुनः एकदा विजय प्रस्थापित करून आ.चव्हाण यांनी आपले वर्चस्व कायम ठेवत हॅट्रीक साधली तर प्रतिस्पर्धी बोराळकर यांचा दारुण पराभव केला.या विजयाने महाविकास आघाडी अधिक बळकट झाली आहे.
फेरी क्रं. सतीश चव्हाण शिरीष बोराळकर
1) 27,250 11,272
2) 26,626 13,929
3) 26,627 13,929
4) 26,700 14,287
5) 8,722 4,438
एकूण 1,16,638 58,743
या विजया बद्दल आ.सतीश चव्हाण यांनी मानले मतदारांचे अंतःकरणपूर्वक जाहीर आभार...
अंतःकरणपूर्वक आभार
आपली सर्वांची साथ प्रत्येक पावलावर होती.
हा विजय तुमच्या निर्व्याज प्रेमाचा आहे.
मार्गदर्शनासह अथक परिश्रम घेणाऱ्या महाविकास आघाडीच्या मान्यवर नेत्यांनी, प्रत्येक ठिकाणी खांद्याला खांदा लावून लढलेल्या कार्यकर्त्यांनी आणि सत्याचाच त्रिवार विजय होतो हे पुन्हा एकदा सिद्ध करणाऱ्या मराठवाड्यातील माझ्या तमाम सुज्ञ पदवीधर बंधू आणि भगिनींनी ही विजयश्री खेचून आणली आहे. प्रसिद्धी माध्यमे आणि समाजमाध्यमांचीही विशेष साथ मिळाली. आपणांस एकूण 1,16,638 मते मिळाली असून 57,895 मतांच्या फरकाने महाविकास आघाडीचा महाविजय झाला आहे.
आपल्या सर्वांचे आभार
-आ.सतीश भानुदास चव्हाण.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा