Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ५ डिसेंबर, २०२०
ऐनपूर महाविद्यालयात खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी यांचा स्मृती दिन साजरा.
प्रतिनिधी रावेर निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथून जवळच ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रा.डॉ.के.जी.कोल्हे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ओव्यातून त्यांनी जीवनाचे तत्वज्ञान सांगितले. बहिणाबाईंनी आपल्या ओव्यातून संसाराचे, निसर्गाचे, परीस्थितीचे वर्णन केले आहे असे प्रमुख वक्ते डॉ.के.जी.कोल्हे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.जे.बी अंजने यांनी सांगितले कवयित्री बहिणाबाई चौधरींची निरीक्षण शक्ती जबरदस्त होती. त्यांच्या ओव्यामधून त्यांच्या निरीक्षण शक्ती चे दर्शन होते. आपल्या ओव्यातून त्यांनी जीवनाचे सार सांगितले आहे. अक्षरशत्रू असूनही त्यांच्या ओव्यांवर अनेक लोक संशोधन करत आहेत. म्हणूनच त्यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.महेंद्र सोनवणे यांनी, सुत्रसंचलन प्रा.दिलीप सोनवणे यांनी केले. तर आभार मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सौ.रेखा पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला ८९ प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभागामार्फत करण्यात आले होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा