Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १२ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
इतर नेत्यांनी आमच्या शिरपूर मतदारसंघात लक्ष देण्याची गरज नाही, आम्ही सक्षम आहोत अवैध व्यवसायांना आश्रय देण्याचा प्रश्नच येत नाही – आ.काशिराम पावरा
इतर नेत्यांनी आमच्या शिरपूर मतदारसंघात लक्ष देण्याची गरज नाही, आम्ही सक्षम आहोत अवैध व्यवसायांना आश्रय देण्याचा प्रश्नच येत नाही – आ.काशिराम पावरा
शिरपूर : कोणत्याही चुकीच्या कामांना थारा दिलेला नाही, तसेच कोणत्याही अवैध व्यवसायांना आश्रय देण्याचा प्रश्नच येत नाही असे आमदार काशिराम पावरा यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात वृत्तपत्रांमधून माझ्यावर अवैध व्यवसायांना आश्रय देण्याबाबतचे आरोप झालेले आहेत. हे सर्व आरोप धादांत खोटे असून या सर्व आरोपांचे मी खंडन करतो.
शिरपूर तालुक्यात कोणीही दोन नंबरचे व्यवसाय करत असतील तर त्यांना आश्रय देण्याच्या दूरदूरपर्यंत प्रश्न येत नाही. आजपर्यंत आमदारकीच्या माध्यमातून मी फक्त विकासकामांनाच प्राधान्य देत आलो आहे. तालुक्याच्या विकासासाठी काम करत राहणे याबाबतच मी पूर्णपणे लक्ष घातले आहे. अतिशय पारदर्शकपणे काम करण्यावरच निश्चितपणे भर देत आलेलो आहे. त्यामुळे अवैध व्यवसायांना आश्रय देण्याचा प्रश्नच येत नाही, असे शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांनी म्हटले आहे.
आजपर्यंत मी चुकीच्या पद्धतीने कोणाच्याही एका पैशालाही हात लावला नाही, चुकीचे काम करत नाही. आदिवासी माणूस असून मी धार्मिक प्रवृत्तीने प्रामाणिकपणे कामे करत आलो असून यापुढे देखील प्रामाणिकपणे कामे करत राहणार आहे.
आजपर्यंत मी कोणत्याही चुकीच्या कामांना थारा दिलेला नाही, तसेच कोणत्याही अवैध व्यवसायाला आश्रय देण्याचा प्रश्नच येत नाही
अवैध व्यवसायांवर वचक ठेवण्याचे काम प्रशासनाचे असून प्रशासनाने त्याबाबत नियमितपणे योग्य ती कारवाई करावी. प्रशासनाने अवैध व्यवसाया बाबत केलेल्या कारवाई बाबत देखील मी कधीही ढवळाढवळ करत नाही, आजपर्यंत ढवळाढवळ केली नाही.
इतर नेत्यांनी आमच्या शिरपूर मतदारसंघात लक्ष देण्याची गरज नाही, आम्ही सक्षम आहोत, असेही आमदार काशिराम पावरा यांनी म्हटले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा