Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २२ डिसेंबर, २०२०

जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य, चाळीसगाव तालुका मार्फत निवेदन देण्यात आले.....!


   
जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य, चाळीसगाव तालुका मार्फत निवेदन देण्यात आले  की,जन आक्रोश लक्षात घेता सार्वजनिक शौचालय व सार्वजनिक मुतारीचे बांधकाम करण्यात यावे.
    
दहिवद गावातील वॉर्ड क्र.२ मधील अधिकतर जनता ही परिस्थितीने गरीब असून वैयक्तिक शौचालयाचे प्रमाण खूपच कमी आहे. तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयांची संख्या ही पुरेशी नाही.

त्यामुळे बहुसंख्य जनता ही उघड्यावर शौचास जाते.त्याचप्रमाणे काही ठिकाणी सार्वजनिक मुतारींची देखील सोय करण्यात आलेली नाही. या गोष्टीची जाणीव ग्रामसभेच्या वेळेस ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला वारंवार करून देखील या अत्यावश्यक विकास कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे .
       
२६ जानेवारी २०२० च्या ग्रामसभेत ठराव संमत करून देखील सदर विषय आजपर्यंत दुर्लक्षित राहिला आहे. महिला वर्गाने या मागणीसाठी ग्रामसभेला हजेरी लावून देखील महिला शौचायलायचा विषय गांभीर्याने घेतला जात नाही.
   
परंतु आता जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य,चाळीसगाव तालुका जनतेच्या समस्या निवारणासाठी जनतेसोबत जन आंदोलन उभारून शौचालायचा व सार्वजनिक मुतारीचा प्रश्न मार्गी लावणार आहे.सामान्य जनतेच्या रास्त मागणीकडे ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत आहे.सदर वार्डातील शौचालाय व मुतारी लवकरात लवकर न बांधल्यास तीव्र आंदोलन जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य,
चाळीसगाव तालुका कडून करण्यात येईल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध