Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ९ डिसेंबर, २०२०
बुलडाण्यात 'स्वाभिमानी' आक्रमक...चेन्नई - रोखली..
शेगाव शहर (उमेश राजगुरे) दि.9 शेतकऱ्यांच्या भारत बंदला जोरदार सुरुवात झाली आहे. 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्यांसह चेन्नई - अहमदाबाद (नवजीवन) एक्सप्रेस मलकापूर रेल्वे स्थानकावर रोखली आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारने तात्काळ तोडगा काढावा यासाठी बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आज सकाळ पासून रस्त्यावर उतरली आहे. सकाळी 6.40 वा. चेन्नई - अहमदाबाद एक्सप्रेस रोखून रविकांत तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी रविकांत तुपकर व कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. त्यामुळे 'स्वाभिमानी' व पोलिसांमध्ये चांगलाच संघर्ष निर्माण झाल्याचे बघायला मिळाले यावेळी रविकांत तुपकरांसह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे..आजचा रेल रोको हा ट्रेलर आहे जर लवकर तोडगा काढला नाही तर दिल्लीकडे जाणारी सर्व वाहतूक रोखू असा इशारा रविकांत तुपकरांनी यावेळी दिला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा