Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

राग ध्यान आणि त्यांची चित्र..!



भारतीय अभिजात संगीतात अध्यात्मिक विकास त्यातून प्राणायाम ध्यान योगा तसेच चित्रकलेला सुद्धा विशेष महत्त्व दिलेले आहे कारण भारतीय अभिजात संगीतातील राग रागिनी यांचा उल्लेख देवी-देवतांशी केला गेलेला आहे आणि त्या आधारावर बऱ्याच रागांची पुरातन काळात चित्र सुद्धा काढली गेली.

रंजकता हेच रागाचे एक प्रमुख लक्षण आहे. राग रंजक असल्याकारणामुळे त्यामध्ये भाव हा प्रधान असतो.रागांमध्ये स्वर आहे पण भावनाही प्रबळ आहेत.स्वरांच्या वेगवेगळ्या वापराने रागांचे भाव देखील बदलतात.संगीत (राग) भावनांवर आधारित आहे. काही राग ऐकल्यावर आपल्यामध्ये करून भाव उद्भवतो तर काही राग ऐकल्यावर शृंगारिक रस सुद्धा निर्माण होतो. 

भारतीय संस्कृतीत अध्यात्माला विशेष महत्त्व आहे.मानवांनी प्रत्येक गोष्ट देवाशी जोडली आहे.प्रत्येक कला, प्रत्येक क्षेत्र भगवंताशी जोडलेला आहे हे सगळं असूनही असे कसे शक्य आहे की ते संगीत देवाशी जोडले गेलेले नाही? संगीताचे प्रत्येक क्षेत्र अध्यात्मिक रंगात साकारले गेले आहे. जो राग संगीतात प्रधान आहे त्याला ईश्वराशी जोडले गेलेले आहे. प्रत्येक राग त्याच्या भावनांवर आधारित देवी किंवा देवताशी संबंधित होता.प्रत्येक रागाला देवी देवता मानून त्याला एक साकार रूप देण्याचा प्रयत्न केला.

संगीतोपनिषत्सारोद्वार (१४ ई•) या ग्रंथात ७ स्वर, ६ राग आणि ​​36 भाषांचे ध्यान प्रथम वर्णन केले आहे.जसे कि राग भैरव, भैरव याचे ध्यान:भैरवः श्वेतवर्ण स्यादेक वक्त्रोडष्टहस्तभाक् । वृषमानः कृतिवासा काल भैरव रूपघृत् ।।सर्व त्रिशूलखट् 
वाग्ङजपमालाभि रन्वितैः।वीणा 
पाशकलाजैश्च पाणिभि भूषितोह्ययम्

या ध्यानात भैरव रागाचे वर्णन केले आहे.  त्याचे स्वरूप असे वर्णन केले आहे की जणू भैरव पांढर्‍या रंगा चा आहे, त्याकडे त्रिशूल, खडगा इत्यादी आहेत. अशा प्रकारे इतर रागांचेही ध्यान सांगितले आहेत गर्ग संहितेत सुद्धा अशा अनेक राधा रागिनी यांचे ध्यान मिळते विषयी माहिती उपलब्ध होते.  पं.अहोबाल यांनीही रागांची रचना केली आहे.  त्यांनी वर्णन केलेले भैरव रागाचे ध्यान खालीलप्रमाणे आहे.

गंगाधरः शशिकला तिलक स्त्रिनेत्रः । 
सपैर्विभूषिततनुर्गजकृत्तिवासाः ।।
भास्वत् त्रिशूलकर एव नृमुंडधारी ।
न शुभ्राम्बरो जयति भैरव आदिरागः ।। 
अर्थ आहे ज्याच्या डोक्यावर गंगा आहे. माथ्यावर चंद्र आहे. गळ्यात सर्प मला आहे. ज्याने हत्तीचर्म परिधान केले आहे. हातात चकाकणारा त्रिशूल आहे गळ्यात मुंड माला आहेत सफेद वस्त्र परिधान केले आहे.असा आधी राग भैरव जय हो 
 
कलितविपंची विपिने
लालितहरिणारूणाम्बरा हरिणी ।
धवलांगरागरचना मृदुबचना भूषिता तोड़ी ।। 
राग ध्यान केवळ संस्कृतच नव्हे तर हिंदी भाषेतही निर्माण केले गेले. हा जो राग ध्यानाचा उल्लेख आहे हा त्या काळातील रागांना समोर ठेवून केला गेलेला आहे आजच्या रागांमध्ये काही प्रमाणात फरक दिसून येतो राग ध्यानांवर आधारित, हळूहळू चित्रे बनू लागली. कलाकारांनी हे राग-ध्यान समोर ठेवून राग-चित्रे तयार केली.राग - रागीणी चित्रांची परंपरा इथपासून सुरू झालेली आहे . राग चित्रां चा आरंभ १५वी आणि १६ वी इ.स. पासून आहे. राग चित्रां च्या बर्‍याच शैली आहेत |  राजस्थानी शैली, मालवा शैली, दखनी शैली आणि कांगडा शैली.  प्रसिद्ध आहे. 

मूलभूतपणे, सर्वांमध्ये सामंजस्य आहे, परंतु वेगवेगळे रंग त्याचा प्रयोग आणि चित्रकला चे वेगवेगळ्या शैली मुळे एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. या राग चित्रांना 'राग माला' चित्र म्हणून ओळखले जाते. 
               
6 राग आणि त्यांची 36 रागणी यांच्या चित्राखाली त्यांचे ध्यान लिहिलेले मिळते. तोडी रागाच्या चित्रांमध्ये विशेष करून हरणीचे चित्र अवश्य मिळते आणि रंग देखील रागच्या स्वरूपानुसार वापरले जातात. 
पुंडलिक कोल्हटकर
9552554697
               
(वरील लेखासाठी काही ग्रंथ व इंटरनेटचा मदत घेतली आहे).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध