Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ५ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
अन्न सुरक्षा कायद्या अन्वये गुन्हा दाखल झालेला रेशन दुकांदारांचा अमळनेर तालुक्यात बोलबाला.
अन्न सुरक्षा कायद्या अन्वये गुन्हा दाखल झालेला रेशन दुकांदारांचा अमळनेर तालुक्यात बोलबाला.
अमळनेर तालुक्यात अन्न सुरक्षा कायदा कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल झालेल्या रेशन दुकांदारांना जोडली चार रेशन दुकाने
उपसंपादक पंकज पाटील अमळनेर
अमळनेर:तालुक्यात रेशन माफिया व त्यांचा भ्रष्टाचार हा विषय नवा नसून या माफियांना जिवंत ठेवण्यासाठी तालुक्यातील रेशन दुकाने मुक्त हाताने जोडण्याचे काम अमळनेर पुरवठा विभागाकडून नेहमीच सुरु असते.
प्रांत अजय मोरे ,तहसिलदार प्रदीप पाटील यांच्या कार्यकाळात ज्या रेशन दुकानदारावर कलम ३ व ७ नुसार गुन्हे दाखल झाले होते,अश्या रेशन दुकानदारांचे शुद्धीकरण केले तरी कुणी ? कोणत्या अधिकारी /कर्मचारी यांना या रेशन दुकानांच्या कामांत पारदर्शक कारभार दिसून आला ? हे प्रश्न आजही जनतेसमोर आहेतच .अश्यातच आजही गैरकारभार करणाऱ्या रेशन दुकांदारांना पुरवठा विभागाकडून जवळ घेतले जात आहे .
रेशन दुकानाचा काळा बाजार करणाऱ्या याच दुकांदाराकडून जिल्हावरून दुकानाची तपासणी होणार असल्याचे भय दाखवून तालुक्यातील दुकानदाराकडून पाकीट गोळा केली जात असून ती पाकीट जिल्ह्यावर पोहचवली जात असल्याची वार्ता तालुक्यात आहे.
एकंदरीत अमळनेरची रेशन प्रणाली पुर्णपणे भ्रष्टाचाराच्या विळख्यात असून खरा व गरजू लाभार्थी आजही वंचित आहे.लॉकडाऊन काळात गरिबांच्या घरात रेशन न जाता ते रेशन दुकानदारांच्या घश्यात तर गेले नसेल ना ? त्यामुळेच जिल्ह्यावरून दुकान तपासणीचा धाक दाखवून पाकीट गोळा केली तर जात नाहीत ना ? या सर्व प्रकरणाचा तपास सुरु असून खर काय ते जनतेसमोर येईलच .
अमळनेर तहसिलदार यातून जरुर मार्ग काढतील व गुन्हा दाखल झालेल्या रेशन दुकांदारांची दुकाने काढून पारदर्शक प्रणाली आणतील असा विश्वास जनतेला आहे. कारण अमळनेर तहसिलदार यांच्या पारदर्शक कारभाराचा तालुक्यात बोलबाला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा