Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी व पिंपळखुटा या प्रकल्पातील अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी यांची संघटनेची मिटींग




प्रतिनिधी:आज दिनांक 4-12-2020 रोजी अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी व पिंपळखुटा या प्रकल्पातील अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी यांची संघटनेची मिटींग घेण्यात आली सदर मिटींग मधे पिंपळखुटा प्रकल्पातील अंगणवाडी सेविका रेलू वसावे यांचा संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमास मोलगी व अक्कलकुवा प्रकल्पातील बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच पिंपळखुटा प्रकल्पातील सर्व मुख्य सेविका विस्तार अधिकारी तसेच धडगाव प्रकल्पातील प्रमुख अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या बालविकास प्रकल्प अधिकारी मुख्य सेविका विस्तार अधिकारी यांचा ही सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला मोलगी व पिंपळखुटा प्रकल्पातील सेविका मदतनीस मोठ्या संख्यने उपस्थित होत्या. 

सदर कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी ईदिरा तांई पाडवी ,पुजा पाडवी व दोन्ही प्रकल्पातील प्रमुख अंगणवाडी सेविकांनी सहकार्य केले. सदर मिटींगला मार्गदर्शन कार्याध्यक्ष-युवराज बैसाने यांनी केले. यावेळी संघटक सचिव-राजु पाटील, अमोल बैसाने. मोहिनी तांई पाटील, नयनातांई मराठे, निर्मला बैसाने संध्यातांई पाटील राखी तांई पाडवी वसुतांई उपस्थित होत्या.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध