Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०

अमळनेर तालुक्यात किमान आधारभूत किंमतीवरील ज्वारी खरेदी रखडली...!



तहसिलदारांकडून तात्काळ दखल घेणे गरजेचे...!

केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत मका आणि ज्वारी खरेदी केली जाणार होती. या खरेदीसाठी १ नोव्हेंबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० अशी दोन महिन्यांची मुदत आहे. मात्र अमळनेर तालुक्यात पहिल्या दिवसापासून फक्त मका खरेदी केला जात आहे. 

तर ज्वारी खरेदीसाठी ज्यां शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, त्यांना गोडाऊन खाली नाहीत, अशी कारणं दिली जात आहेत. आता शेतकऱ्यांच्या हाती काही दिवस शिल्लक असले, तरी अमळनेरच्या तहसिलदारांनी याबाबत हालचाल केली नाही, तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अमळनेर शहरात वरवार महामंडळ आणि कृषि उत्पन्न बाजार समितीचे गोडावून पणन महासंघाच्या खरेदीसाठी तहसिलदारांनी तात्काळ उपलब्ध करून दिली पाहिजेत. मात्र तसं होताना दिसत नाहीत. संबंधित गोडांवून शंभर टक्के भरलेले आहेत का किती खाली आहेत, याचा आढावा घेऊन गोडावून तात्काळ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

असं झालं नाही, तर मुदत संपेपर्यंत तालुक्यातील ज्वारी खरेदी खोळंबून राहू शकते, यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे कमीत कमी १ हजार रुपयांचा फटका बसणार आहे. या प्रश्नी मुंबईच्या पणन महासंघाने आपण ज्वारी खरेदीसाठी तयार आहोत, पण गोडावून उपलब्ध करून द्यावे असं उत्तर दिलं आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध