Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
विधानपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी असल्याचं पुन्हा निष्पन्न..!
विधानपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी असल्याचं पुन्हा निष्पन्न..!
शिरपूर प्रतिनिधी: धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे (BJP) अमरीश पटेल (Amrish Patel) विजयी झाले असून, त्यांनी काँग्रेसच्या (Congress) अभिजित पाटलांचा पराभव केला आहे. मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी असल्याचं पुन्हा निष्पन्न झालं आहे.
भाजपच्या अमरीश पटेल यांना ३३२, तर काँग्रेसचे अभिजित पाटील यांना केवळ ९८ मतं मिळाली आहेत. त्यामुळे अमरीश पटेल यांचा विजय झाला.काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून (Congress) भाजपात आलेल्या अमरीश पटेल यांची भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या अभिजित पाटील यांच्यात ही सरळ लढत झाली होती. दरम्यान,अमरीश पटेल विरोधकांची ११५ मतं फोडण्यात यशस्वी झाले. भाजपच्या १९९ तर महाविकास आघाडीच्या २१३ मतदारांनी मतदान केले होते.
काँग्रेसच्या किमान ५७ मतदारांचे क्रॉस व्होटिंग झाले असून, काँग्रेसचं संख्याबळ १५७ असतानाही पाटील यांना ९८ च मते मिळाली आहेत. आघाडीच्या किमान ११५ मतदारांनी क्रॉस व्होटिंग केले आहे तर ४ मते बाद झाली आहेत.महाविकास आघाडीची २१३ मते असतानाही पाटील यांना ९८ च मते मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा