Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १ डिसेंबर, २०२०
लहुजी शक्ती सेना उस्मानाबाद "जिल्हा सचिव" पदावर संतोष हनुमंते यांची नियुक्ती...
उस्मानाबाद (राहूल शिंदे)दि.1लहुजी शक्ती सेना उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणीच्या जिल्हा सचिव या पदावर संतोष हनुमंते यांची नियुक्ती करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मातंग समाजातील अत्यंत आक्रमक संघटना म्हणून सर्वपरिचित असणारी "लहुजी शक्ती सेना" या संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हा सचिव या पदावर समुद्रवाणी ता. उस्मानाबाद येथील संतोष हनुमंते या युवा, सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली.
हे उच्चविद्याविभूषित असून मातंग समाजाच्या सर्वच प्रश्नाची जाण असणारे, अत्यंत प्रभावी संभाषण कौशल्य आणि क्रियाशील कार्यकर्ते आहेत.त्यांना लहुजी शक्ती सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. सोमनाथ कांबळे तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी गायकवाड, उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी कांबळे, लहुजी शक्ती सेना कट्टर समर्थक महेश सोनपारखे , जिल्हा संघटक विशाल कांबळे, किसन देडे, अजय कांबळे यांच्या हस्ते नियुक्ती देण्यात आली. सोमनाथ कांबळे यांनी संतोष हनुमंते यांना जबाबदारी सह पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा