Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २७ डिसेंबर, २०२०

वाहन परवाना,नोंदणी प्रमाणपत्र,परमिट या वाहनांच्या कागदपत्रांची वैधता ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढविण्यात आली



नवी दिल्‍ली :(२७ डिसेंबर २०२०) केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन परवाना, नोंदणी प्रमाणपत्र,परमिट यासारख्या वाहनविषयक कागदपत्रांची वैधता कोविड-१९ चा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवली आहे. यात १ फेब्रुवारी २०२० किंवा ३१ मार्च २०२१ रोजी वैधता संपणाऱ्या सर्व कागदपत्रांचा समावेश आहे. यामुळे नागरिकांना सामाजिक अंतर राखून वाहतुकीशी संबंधित सेवा मिळविण्यात मदत होईल. मंत्रालयाने आज यासंदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मार्गदर्शक सूचनांचे महत्त्व समजून योग्य रितीने याची अंमलबजावणी करावी, जेणेकरुन कोरोना महामारीच्या काळात नागरीक,वाहतूकदार आणि इतर संघटनांना त्रास होणार नाही,अशी विनंती केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने केली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध