Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ९ डिसेंबर, २०२०

परंडा तालुक्यातील सिंचन कामांना,निधी उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन - आ.तानाजी सावंत




परंडा (राहूल शिंदे) दि.8 कृष्णा मराठवाडा सिंचन योजने अंतर्गत परंडा मतदार संघात सिचन कामाना गती देण्यात यावे यासाठी शिवसेना उपनेते तथा माजी मंत्री प्रा.डॉ. आ.तानाजीराव सावंत यांनी उजनीचे पाणी मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे असल्याने नियोजित प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची वारंवार चर्चा पत्रव्यवहार पाठपुरावा चालू आहे शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दि.16 नोव्हेंबर 2020 रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन उजनीच्या पाण्याचे सदर भागाकरिता नितांत गरज असल्याचे निदर्शनास आणून देत हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक बोलवण्यासाठी विनंती केली होती.

त्यांच्या विनंतीची दखल घेत त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली दि. 26 नोव्हेंबर 2020 रोजी मुंबई येथील वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आढावा बैठकीचे आयोजन केले होते यामध्ये कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प उस्मानाबाद या प्रकल्पास सन 2017 मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती सदर प्रकल्पास बीड जिल्ह्याच्या समावेशासह सन 2009 मध्ये प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

त्यानुसार प्रकल्पाचे नियोजन करून कामे सन 2009 -10 पासून सुरू करण्यात आली होती या प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी आणि त्यांनी निवडणुकीच्या वेळी बोलताना मतदारसंघातील शेतकरी बांधवांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. प्रकल्पास पर्यावरण विभागाची मान्यता नसल्याने प्रकल्पाची कामे बंद ठेवण्यात आली होती.सन 2015 मध्ये पर्यावरण विभागाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रकल्पाची कामे सुरु करण्यात आली नीरा व सीना या दोन्ही नद्या भीमा नदीच्या उपनद्या असल्याने नीरा नदीत उपलब्ध 7.00 उघफु पाणी प्रकल्पास सन 2017 मध्ये उपलब्ध करून देण्यात आले सन 2018 मध्ये शासनामार्फत प्रकल्पाचे फेर नियोजन व प्राधान्यक्रम ठरवण्यात आला सदर शासनाच्या सूचनेनुसार प्रथम प्राधान्याने उद्धट बॅरेज निरा भिमा जोड बोगदा जेऊर बोगदा व मिरगव्हाण पंपगृह इत्यादी कामे हाती घेण्याबाबत शासनाने सूचित केले आहे.

सिना कोळेगाव प्रकल्प सन 2010 पासून 2020 पर्यंत प्रकल्प फक्त चार वेळा 100% क्षमतेने भरला आहे उजनी प्रकल्पाचा विचार केला तर सन 2020 पर्यंत प्रकल्पातून 90 उघफु पाणी प्रकल्पाचा खालच्या बाजूस नदी द्वारे वाहून गेले आहे निरा वसिना या दोन्ही नद्या भीमा नदीच्या उपनद्या असल्याने एकाच उपखोर्यात येत आहेत लवादाच्या निर्णयाच्या अधीन राहून उजनी जलाशयातून अतिरिक्त वाहून गेलेले पाणी सीना-कोळेगाव प्रकल्पातून वळविण्यास प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात सुमारे सहा हजार हेक्‍टर सिंचनाचा लाभ निर्माण होऊ शकतो प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील कामे सुरू करण्याचे नियोजन असून मुख्यमंत्र्यांनी परंडा भूम वाशी मतदार संघातील साकत मध्यम प्रकल्प पर्यंत ची कामे हाती घेऊन पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत सीना-कोळेगाव प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील कामे दीड वर्षात पूर्ण करण्याच्या तात्काळ मंजुऱ्या व सूचना दिल्या आहेत त्या सर्व कामाचा पाठपुरावा आ.सावंत जातीने करत आहेत.

यावेळी बोलताना म्हणाले की, पद असो वा नसो जनतेला दिलेला शब्द पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सहमतीने पूर्णत्वास नेत आहे. बैठक यशस्वीरित्या पार पडली असून प्रकल्पाचे कामे पूर्ण करण्यासाठी निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. कामाचा दररोज आढावा स्वतः घेत असून या बैठकीस मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागार अजोय मेहता ,प्रधान सचिव विकास खरगे ,प्रधान सचिव जलसंधारण लोकेश चंद्र ,सचिव प्रकल्प समन्वयक एन व्ही शिंदे उस्मानाबाद पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता भारत शिंगाडे , कार्यकारी अभियंता प्रवीण चावरे आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध