Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १० जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
गुटखा विक्री करणाऱ्यांना आळा बसणार, आता राज्यात गुटका विकी केल्यास 10 वर्ष शिक्षा,न्यायालयाचा मोठा निर्णय...!
गुटखा विक्री करणाऱ्यांना आळा बसणार, आता राज्यात गुटका विकी केल्यास 10 वर्ष शिक्षा,न्यायालयाचा मोठा निर्णय...!
मुंबई :राज्यात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्रिक्रीला बंदी आहे. मात्र तरीही बेकायदेशीर पद्धतीने गुटख्याची विक्री केली जात आहे. मात्र आता या गुटखा विक्री करणाऱ्यांना आळा बसणार आहे.
गुटखा विक्री करणाऱ्याला 10 वर्षांची शिक्षा आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 188 सोबतच कलम 328 लावता येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
2012 पासून गुटखाजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे. मात्र राज्यात सर्रास विक्री सुरु आहे. याबाबत एका एका आरोपीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
मात्र राज्यातील मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी तसेच नगर व धुळे जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी विरोध करत उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठात रिटा याचिका दाखल केली.
दरम्यान, याचिकेवर याचिकेवर सुनावणी देत सर्वोच्च न्यालयाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आरोपीविरोधात कलम 188 व 328 लावणे आवश्यक असल्याचं सांगून उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंड पीठाने दिलेला निर्णय रद्द केला.
त्या मुळे आता गुटखा विक्री करणाऱ्यांना आळा बसणार असून आता राज्यात गुटका विकी केल्यास 10 वर्ष शिक्षा होणार असल्याचा न्यायालयाचा मोठा निर्णय झाल्याने किमान आता तरी गुटखा विक्री बंद होईल अशी आशा आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
वृत्तसंकलन विभाग नाशिक वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून काजिमाळा, धरमबर्डा, भनवड, देवसाना, करंजखेड,, कापाच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा