Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १० जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांचे झाले नुकसान परिसरातील नेते मंडळी कुठे..! दिग्विजयसिंग राजपुत..!
अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांचे झाले नुकसान परिसरातील नेते मंडळी कुठे..! दिग्विजयसिंग राजपुत..!
दोंडाईचा प्रतिनिधी:दि.८ जानेवारी २०२१ रोजी अतिवृष्टी पावसामुळे शेतातील गहू,हरभरा अशे अनेक पिंकाचे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मनविसे चे पदधिकारी कार्यकर्ते सह शेतकऱ्यां न कडून करण्यात येत आहे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने रामी परिसरातील शेतकऱ्यांचे गहू,हरभरा अशे अनेक पिके उद्ध्वस्त झाले आहेत नव्या उमेदीने पेरण्या केल्या होत्या मात्र या अवकाळी पावसामुळे उभी पिके उध्वस्त झाली गहू हरभरा ज्वारी ही पिके वादळामुळे आडवी झाली असून यामुळे शेतकऱ्यांचे स्वप्न आता धुळीस मिळाले या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
रामी परिसरातील नुकसान झालेल्या शेतात महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थ्यी सेनेचे पदधिकारी, कार्यकर्ते सह शेतकऱ्यांनी पाहणी केली या वेळी दिग्विजयसिंग राजपुत यांनी म्हटले की, शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तरी एक ही नेता शेतकऱ्यांन पर्यंत आला नाही एकही नेताने शेताची पाहणी केली नाही मग कुठे आहेत हे राजकारणी लोक आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य किवा पंचायत समिती सदस्य जसे मते मागण्यासाठी आमच्या घराच्या उंभरट्या पर्यंत येतात तसे आता आमच्या शेतकरी बांधवावर उपासमारीची वेळ आली तर तेव्हा पण मदतीसाठी यायला हवे आता कुठे गेलेत ? ज्यावेळेस मतदानाची वेळ येते त्यावेळेस गलो गल्लीत आणि ज्यावेळेस मदतीची वेळ येते त्यावेळेस घरात नेते मजेत तर शेतकरी कजेत अशे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान नसून शेतकऱ्याचे स्वाभिमानी मनाला नतभ्रष्ट वृत्ती कडून झालेले पिळवणूकच म्हणावी शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हा पुन्हा एकदा अतिवृष्टीने हिरावून नेला. कर्जाचा बोजा डोक्यावर घेऊन फिरणारा पीडित शेतकरी हा गहू,हरभरा या पिकांवर आस धरुण होता.
पण साडेसाती लागलेला शेतकऱ्याचा नशिबाला अजून एक वादळी संकटाला सामोरे जावे लागले. शेतातील पिकांचे नुकसान झाले हे आपल्या उघड्या डोळ्यांनी बघणारा शेतकरी आता मनाने पूर्ण खचून गेला अतिवृष्टी व वादळ वारा मुळे झालेल्या पिकांचे ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी अक्षय राजपुत, रोहित राजपुत, हंसराज राजपुत, विशाल राजपुत शिंदखेडा तालुक्यातील मनविसे चे पदधिकारी सह कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी केली..!
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
वृत्तसंकलन विभाग नाशिक वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून काजिमाळा, धरमबर्डा, भनवड, देवसाना, करंजखेड,, कापाच...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा