Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २३ जानेवारी, २०२१

हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 95 व्या जयंतीनिमित्त..!




हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 95 व्या जयंतीनिमित्त व नेताजी सुभाष चंद्र बोस शिवसेना कार्यालय गणेश मार्केट जवळ सांगली येथे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक आदरणीय गुरुवर्य भिडे गुरुजी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना भिडे गुरुजी म्हणाले की सांगली मध्ये शिवसेनेच्या किमान 250 ते 300 शाखा असणे आवश्यक होते तसेच बाळासाहेबांनी तमाम हिंदुत्वावर काम करताना एक वेगळा आदर्श घालून दिला आहे बाबरी मशीद पाडली तेव्हा पाडणारे आमचे शिवसैनिक असतील तर त्याचा मला अभिमान आहे असे ठणकावून सांगणारे एकमेव बाळासाहेब ठाकरे होते तसेच या महाराष्ट्राला हवा आणि पाण्याची जशी गरज आहे तशी या तमाम महाराष्ट्राला शिवसेनेची गरज आहे असे गुरुवर्य भिडे गुरुजी यांनी सांगितले 1 मे 2016 रोजी उद्धव साहेब ठाकरे यांना मी सांगलीत बोलावले होते.

ते या कारणासाठी की आपल्या सांगलीमध्ये शिवसेना जोरात वाढावी या उद्देशाने मी उद्धव साहेबांना सांगलीमध्ये कार्यक्रमानिमित्त बोलवले होते असे गुरुजी आणि उपस्थित शिवसैनिकांना सांगितले सांगलीत शिवसेना वाढावी हिंदुत्व वाढावा ही आपली प्रामाणिक भूमिका असल्याचे गुरुजी यांनी सांगितले तसेच सदरचा कार्यक्रम आटपून गुरुजी समवेत उपस्थित शिवसैनिक स्टेशन चौकातील बाळासाहेब ठाकरे चौकाच्या सुशोभीकरण कामाच्या शुभारंभ करण्यास गेले सदरच्या जुन्या स्टेशन चौकास बाळासाहेब ठाकरे चौक नामकरण करण्यास रावसाहेब घेवारे, प्रभाकर कुरळकर,अनिल शेटे,जितेंद्र शहा, महिला आघाडी सांगली शहर प्रमुख मानसी शहा,यांनी वेळोवेळी निवेदने व पाठपुरावा करून सदर चौकास बाळासाहेब ठाकरे नामकारण करून खूप मोठी भूमिका पार पाडली आहे सदरच्या चौकाचे नामकरण वेळेस रावसाहेब घेवारे,जितेंद्र शहा, अनिल शेटे, प्रभाकर कुरळकर, यांनी श्रीफळ वाढवला या चौकाला नामकरण करण्यास वरील शिवसैनिकांचे सिंहाचा वाटा आहे यावेळी उपस्थित रावसाहेब घेवारे प्रभाकर कुरळकर,अनिल शेटे, जितेंद्र शहा,प्रसाद रीसवडे, अतुल माने,मानसी शहा, प्रियांका साळी, अक्षय सुतार,आकाश पाटील, प्रकाश लवटे,स्नेहल पाटील,इत्यादी जुने शिवसैनिक उपस्थित होते.
तरुण गर्जना प्रतिनिधी
प्रमोद चिनके
सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध