Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १३ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
जामनेर मध्ये राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी....!
जामनेर मध्ये राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी....!
जामनेर प्रतिनिधी: आज १२ जानेवारी जामनेर तालुक्यासह शहरांमध्ये विविध सामाजिक राजकीय संघटना व शासकीय कार्यालया मध्ये राजमाता जिजाऊ यांची व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल जामनेर दुर्गानगर येथील हर्षल शिवाजी पालवे,तसेच कोविड काळात रुग्णांना जागेवर जेवण वाटप करणारा योगेश माळी (सोनू)आरोग्य क्षेत्रात सेवा बजावणारे गणेश चौधरी,ईश्वर चौधरी,युवा पत्रकार अमोल महाजन,व युवा राजकीय नेतृत्व आतिश झाल्टे यांचा सत्कार आ. गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जेष्ठ नेते छगन झाल्टे, डॉ.प्रशांत भोंडे,उपनगराध्यक्ष शरद पाटील सर,जितेंद्र पाटील,राजधर पांढरे,बाबुराव हिवाराळे, सरचिटणीस रविंद्र झाल्टे,सुभाष पवार, दिपक तायडे, सुहास पाटील, दत्तात्रय सोनवणे,नितीन झाल्टे,दत्तू काळे, संजय सूर्यवंशी,हर्षल चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
धुळे प्रतिनिधी :- १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकाला न्यायालयाने ३ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुन...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा