Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १३ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
नागरिकांच्या जिवाला धोकादायक ठरणाऱ्या चिनी नायलॉन मांजाच्या विक्रीवर राज्य सरकारने घातली बंदी...!
नागरिकांच्या जिवाला धोकादायक ठरणाऱ्या चिनी नायलॉन मांजाच्या विक्रीवर राज्य सरकारने घातली बंदी...!
प्रतिनिधी:पक्षी, प्राण्यांसह नागरिकांच्या जिवालाही धोकादायक ठरणाऱ्या चिनी आणि नायलॉन मांजाच्या विक्रीवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. मात्र तरीही अशा जीवघेण्या मांजाची छुपी विक्री, वापर आणि साठवणूक केली जात असल्याने पोलिस सतर्क झाले आहे.
परिसरात पत्रके लावून तसेच मेगाफोनद्वारे याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आला आहे. ही बंदी झुगारून नायलॉन मांजाचा वापर करताना कुणी आढळल्यास बंदी आदेश न पाळल्याबद्दल गुन्हा दाखल होऊन तुरुंगवासही होऊ शकतो, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
सक्रांतीच्या काळात पतंगबाजी करताना नायलॉन मांजाचा वापर केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो.
या धोकादायक मांजामुळे या कालावधीत अनेक पक्षी, प्राणी जखमी होतात, तर काही मृत्युमुखी पडतात. त्यामुळे राज्य सरकारने १९८६च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ५नुसार या मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. तरीही या मांजाची विक्री आणि वापर सर्रास सुरू असतो. अशा विक्रेत्यांवर आणि मांजा वापरणाऱ्या पतंगप्रेमींवर मुंबई पोलिसांची बारीक नजर असेल. आधीच बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांवर संक्रांत कोसळली असताना मांजामुळे पक्ष्यांचे जीव जाऊ नयेत यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
...अन्यथा गुन्हा
नायलॉन किंवा चिनी मांजा वापरताना अगर विक्री करताना कुणी आढळल्यास बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल होईल. हा जामीनपात्र गुन्हा असला, तरी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे एक महिना कारावास किंवा दंड तसेच दोन्ही शिक्षा होऊ शकतात. या मांजामुळे कुणी जखमी झाल्यास भादंविच्या इतर कलमांनुसारही कारवाई केली जाऊ शकते, असे पोलिसांनी म्हटले आहे.
हळदीकुंकू समारंभासाठीही खबरदारी
संक्रांत सणाचे औचित्य साधून घरोघरी, संस्था, कार्यालये तसेच राजकीय पक्षांच्या वतीने अनेक ठिकाणी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले जाते. यासाठी महिला मोठ्या संख्येने नटूनथटून घराबाहेर पडतात. त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये यासाठी या कालावधीत ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवून चोरी, सोनसाखळी चोरी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देशही सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
धुळे प्रतिनिधी :- १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकाला न्यायालयाने ३ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुन...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा