Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १२ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
संत जगनाडे महाराजांच्या पुणतिथीनिमित्त त्यांनी दिलेली शिकवण सर्व समाजबांधवांनी अंगिकारावी...!आ. काशिराम पावरा यांचे प्रतिपादन..!
संत जगनाडे महाराजांच्या पुणतिथीनिमित्त त्यांनी दिलेली शिकवण सर्व समाजबांधवांनी अंगिकारावी...!आ. काशिराम पावरा यांचे प्रतिपादन..!
शिरपूर येथे संत जगनाडे महाराज तेली समाज भुवन नुतनीकरण वास्तुचे उद्दघाटन, संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी साजरी
शिरपूर : शिरपूर तालुक्यात आ. अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी शिरपूर तालुक्याचा कायापालट केला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळीमेळीचे व शांततामय वातावरण निर्माण झाले आहे.
संत जगनाडे महाराजांच्या पुणतिथीनिमित्त त्यांनी दिलेली शिकवण सर्व समाज बांधवांनी अंगिकारावी तसेच समाज बांधवांनी आपल्या मुलामुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असावे. परिश्रम, चिकाटी व जिद्दीच्या जोरावर तेली चौधरी समाज बांधवांनी समाजाला पुढे नेण्याचे काम शिरपूर तालुक्यात झाले असून ही फारच भूषणावह बाब आहे असे प्रतिपादन आमदार काशिराम पावरा यांनी केले. येथील तेली समाज पंच मंडळ तर्फे तेली समाज भुवन नुतनीकरण वास्तुचे उद्घाटन समारंभ समाज बांधव व अनेक मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. तसेच श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी दि. ११/०१/२०२१ सोमवार रोजी सायंकाळी ७ वाजता साजरी करण्यात आली. शिरपूर शहरातील चौधरी गल्ली या ठिकाणी तेली समाज भुवन नुतनीकरण वास्तुचे उद्घाटन उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांचा हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन द्विप प्रज्वलन करुन आ. काशिराम पावरा यांचा हस्ते करण्यात आले. संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, न. पा. बांधकाम सभापती सौ. छायाताई ईशी, मोहन पाटील (गटनेते व नगरसेवक शि.व.न.प.शिरपूर), राजगोपाल भंडारी (उपाध्यक्ष शिरपूर एज्युकेशन सोसायटी), नरेंद्रसिंह सिसोदिया (सभापती कृ. उ. बा. समिती शिरपूर), प्रसन्न जैन (चेअरमन शिरपूर मर्चंट बँक) उपस्थित होते, बबनराव चौधरी (जिल्हाध्यक्ष तैलिक समाज महासभा धुळे तथा अध्यक्ष तेली समाज पंच मंडळ शिरपूर), जगन्नाथ ईशी, जे. एस. चौधरी, शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, धुळे भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, माजी कृउबा समिती सभापती नारायणसिंग चौधरी, सामाजिक कार्यकर्ते नितिन राजपूत, नगरसेवक देवेंद्र राजपूत, शहर व तालुक्यातील अनेक मान्यवर, समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल म्हणाले, चौधरी समाजाच्या उन्नतीसाठी समाजातील अनेक मान्यवरांचे मोठे योगदान आहे. समाज बांधवांनी यापुढेही प्रत्येक घटकाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावे. आम्ही प्रत्येक सामाजिक कार्यात तुमच्या सोबत आहोत. शिरपूर तालुक्यात चौधरी समाजाने प्रत्येक क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे.
प्रास्ताविकपर भाषणात बबनराव चौधरी म्हणाले, माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यात विकासाची कामे मोठया प्रमाणात असल्याची बाब आनंदाची असून आमच्या तेली चौधरी समाजाला देखील मोठया प्रमाणात न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. सामाजिक कार्यासाठी आम्ही समाज बांधवांनी झोकून दिले असून सर्वांच्या सहकार्याने समाज भवनाचे निर्माण झाले आहे. समाजाची गरज पाहता अजून मोठया समाज भवनाचे निर्माण करायचे आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, शामकांत ईशी, संजय चौधरी यांनी ही मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचलन संदीप चौधरी यांनी केले. आभार दुर्गेश चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बबनराव चौधरी (जिल्हाध्यक्ष तैलिक समाज महासभा धुळे तथा अध्यक्ष तेली समाज पंच मंडळ शिरपूर), शिरपूर तेली समाज पंच मंडळ उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, खजिनदार संतोष चौधरी, सचिव जगदिश चौधरी, सहसचिव रमेश चौधरी, कार्यकारी सदस्य सुरेश चौधरी, शामकांत ईशी, संजय चौधरी, ईश्वर चौधरी, चंद्रवदन चौधरी, मोहन चौधरी, दुर्गेश चौधरी, नरेश चौधरी, युवराज चौधरी, महेश चौधरी, विजय चौधरी, जितेंद्र सोनवणे, योगेश चौधरी, उत्तम चौधरी, विजय चौधरी, सुरेंद्र चौधरी, अनेक समाजबांधव यांनी परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
वृत्तसंकलन विभाग नाशिक वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून काजिमाळा, धरमबर्डा, भनवड, देवसाना, करंजखेड,, कापाच...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा