Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १३ जानेवारी, २०२१

आत्महत्या की हत्या? भोई समाजावरील अन्याय कधी थांबणार?? शासन लक्ष देईल काय!



-रोहित भाऊ शिंगाणे सहसंपादक

भोई समाजातील नामदेव शेषराव पंदलवाड, राहणार मजरे सांगवी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड यांना मंदिराच्या कामासाठी कोल्हापूर येथून बोलावणे आले होते. मंदिराचे काम करून घेण्यात आले आणि ग्रामपंचायत इलेक्शनचा मुद्दा समोर करून शाब्दिक भांडण करण्यात आले होते. त्यानंतर पंदेलवाड यांचा मृतदेह खिडकीला मफलरने लटकवलेला आढळला. ही आत्महत्या नसून हत्या दिसुन येत आहे. खिडकीला लटकून कोणीही आत्महत्या करू शकत नाही.  ही फारच दुर्दैवी घटना घडली असून, पोलिसांकडून याची नीट चौकशी होणे आवश्यक आहे. 

भोई समाज असंघटित असण्याचा हा सर्वात मोठा फटका समाजाला बसतो.. कोणीही ऊठसूट भोई समाजावर अन्याय करून जातो आणि त्या विरोधात समाजाकडून कसलाही आवाज उठविला जात नाही हे महाराष्ट्रातील निर्विवाद सत्य आहे. मात्र भोई समाज आता जागृत होत असून अशा अन्यायाविरुद्ध संघटित होत आहे. शांतपणे जीवन जगत असतांना वारंवार अन्याय होत असलेला हा समाज आता एल्गार करण्याच्या तयारीत आहे. 

भोई समाज सेना चे संस्थापक अध्यक्ष भिलेशभाऊ खेडकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रोहित भाऊ शिंगाणे, प्रदेश उपाध्यक्ष पुनमचंद भाऊ मोरे, कायदेशीर सल्लागार योगेशभाऊ मोरे,धुळे जिल्हाध्यक्ष अशितोष वाडीले, जिल्हा उपाध्यक्ष खुशाल वाडेकर, धुळे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वरभाऊ जाधव,शिरपूर तालुका अध्यक्ष चंद्रकांतभाऊ वाडीले,अमोल भोई  कासोदा यांनी तातडीने चर्चा करून, भोई समाजावरील होणा-या अन्यायाविरोधात तात्काळ पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला असून, या घटनेची चौकशी योग्यरीत्या केली नाही तर भोई समाज सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहिल  असा इशारा भोई समाज सेना तर्फे देण्यात आलेला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध