Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १३ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिरपूर येथे वासुदेव बाबा मंदीरात सभा मंडपाचे प. पू. संत तारादास बापु यांचा हस्ते भुमिपूजन संपन्न...!
शिरपूर येथे वासुदेव बाबा मंदीरात सभा मंडपाचे प. पू. संत तारादास बापु यांचा हस्ते भुमिपूजन संपन्न...!
जीवन जगत असतांना मानवी जातीला अध्यापक शिक्षणा सोबत अध्यात्मिक शिक्षणाची गरज असते : आ. काशिराम पावरा
शिरपूर प्रतिनिधी : सांस्कारीक जीवनामध्ये जीवन जगत असतांना मानवी जातीला अध्यापक शिक्षणाची गरज असते. त्याच प्रमाणे अध्यात्मिक शिक्षण देखील तितकेच महत्वाचे आहे. राजकारणात आपण जसे मुख्यमंत्र्याला समजून घेतो मंत्रीला समजून घेतो त्याच प्रमाणे अध्यात्मिक मध्ये सुध्दा संताना समजून घ्या जीवनाचे खऱ्या अर्थाने कल्याण करावयाचे असेल तर आपल्याला शिक्षणाची गरज असल्याचे असे मत आ. काशिराम पावरा यांनी शिरपूर येथे व्यक्त केले. दि.१२ जानेवारी रोजी शहरातील वासुदेव बाबा मंदीरात वासुदेव बाबा सभा मंडपाचे भूमिपूजन प. पू. संत तारादास बापु यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, न. पा. बांधकाम सभापती छाया ईशी, नागराज महाराज, श्री समर्थ सदगुरु वासुदेव बाबा ट्रस्ट अध्यक्ष सुरेश चौधरी, उपाध्यक्ष बापू महाजन, धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, संजय आसापूरे, शामकांत ईशी, संजय चौधरी, राजेंद्र चौधरी, संतोष चौधरी, दुर्गेश चौधरी, जगदिश चौधरी, विनोद चौधरी, बापू शिंपी, साहेबराव पाटील, उत्तम खलाणे, अरविंद चौधरी, यशोदाबाई चौधरी, जया खलाणे, रमण चोधरी, महेश चौधरी, राजुलाल मारवाडी, बापू लोहार, सुभाष राजपूत, रविंद्र सोनार, निलेश देशमुख, अविनाश शिंपी, नंदु माळी आदी उपस्थित होते. विश्वमहामारीचा सामना असतांना पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाला आल्याचे सांगून खऱ्या अर्थाने येथे येवून आनंद झाला असे मत प. पू. संत तारादास बापु यांनी शिरपूर येथे व्यक्त केले. उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल म्हणाले भगवंता सोबतच साधुसंताची सेवा करावी तसेच आपण देव इकडे तिकडे न शोधता आई बापाचा रुपात देव घरातच असुन सर्वांनी आई बापाची सेवा करावी सुनांनी सासुला सासु न समजता भगवान समजुन त्यांची सेवा केली तर जीवनात आनंद मिळेल असे सांगितले. भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी म्हणाले सदगुरु वासुदेव बाबा हे बाल ब्रम्हाचारी होते त्यांचा जन्म शिरपुरातच झाला होता ते शिरपूरचे होते. गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांनी नानी मातेचे मंदिर उभारण्यासाठी एक एकर जागा विकत घेतली. त्यावेळी हे मंदिराचे स्थान शहराचे मध्यवर्ती ठिकाण राहिल असे सांगितले होते त्याचप्रमाणे आज हि काॅलनी शहराचा मध्यवर्ती स्थान आहे असे सांगितले. सुत्रसंचालन प्रा. संदीप चौधरी यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने भक्तगण व नागरिक उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा