Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १२ जानेवारी, २०२१

शंकरभाई बी.भोई..! भोई समाजाचा दानवीर कर्ण! ६,६२,१५१ रुपये देणगी!!




रोहित शिंगाणे, सहसंपादक

भोईराज! उगाच हा शब्द भोई समाजाच्या नावामागे पडला नाही, तर त्याला कारणही तसेच असावेत.. इतिहासात अनेक दानवीर कर्ण भोई समाजात झाले असतील, ज्यांची कदाचित आपल्याला माहिती नाही..परंतु वर्तमानात असलेले दानवीर आणि दानशूर असे भोई समाजातील एक व्यक्तिमत्त्व म्हणजे शंकरभाई बी.भोई, रनासन, जिल्हा साबरकांठा, गुजरात..


शंकरभाई बी. भोई  या ८० वर्षाच्या वडीलधाऱ्या व्यक्तिमत्त्वाने ६,६२,१५१ रूपयांची देणगी,अंबाजी येथील भोई समाजाचे भव्य-दिव्य असे समाज मंदिर बांधकामासाठी  दिली.आपली जीवनाची जमापुंजी या समाज भूषण ने देऊन टाकली!! असा दानवीर कर्ण भोई समाजाच्या इतिहासात आणि वर्तमानात झाला नसावा..६,६२,१५१ रुपये एवढी रक्कम देणगी म्हणून भोई समाजात आजतागायत मी तरी ऐकली नाही... अशा या दानशूर व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करावे तेवढे थोडेच...अशा व्यक्तिमत्त्वामुळेच भोई समाजाचा झेंडा भवितव्यात कायम उंचावर फडकत राहिल यात यत्किंचितही शंका नाही.. अशी दानशूर मंडळी जर समाजात असली तर शैक्षणिक संस्था उभ्या करण्यासाठी ही प्रयत्न करण्यात येतील असे विचार भोई समाज क्रांती दल सेवा ट्रस्ट चे श्री प्रविणभाई भोई यांनी व्यक्त केले. 

अंबाजी येथिल हे भव्यदिव्य असे समाज मंदिर बांधकामासाठी खूप मोठी टीम काम करीत असून त्यात प्रामुख्याने भोई समाज क्रांती दल ट्रस्ट गुजरातचे प्रमुख प्रवीणभाई भोई यांचे सोबत जयंती भाई जी कडिया
बांधकाम कमिटी चेयरमन यांचाही सिंहाचा वाटा आहे.  

महत्त्वपूर्ण लोकं जे या ऐतिहासिक वास्तू साठी झटत आहेत,त्यात प्रामुख्याने गुजरात प्रदेश अध्यक्ष प्रवीणभाई सी,भोई
प्रदेश महामंत्री भुलाभाई सी कड़िया, बांधकाम कमिटी प्रदेश चेयरमन जयंतीभाई, जी कड़िया, नरेशभाई के भोई वाइस चेयरमन,प्रदेश राजकीय संयोजक भरतभाई बी महेरा,शिक्षण समिति प्रदेश चेयरमन भरतभाई बी भोई,समाज सुरक्षा समिति चेयरमन रमेशभाई जी भोई, प्रदेश प्रभारी नवीनभाई पी भोई, प्रदेश महिला अध्यक्षा हेमलताबेन जे भोई, प्रदेश युवा अध्यक्ष जयेशभाई ऐ भोई,आर्किटेक  इंजिनीयर जयेशभाई बी भोई,प्रदेश युवा प्रभारी संदीपभाई एन भोई, प्रवीणभाई वी माली प्रदेश कर्मचारी प्रमुख,मनोज जस भोई एकाउंटंट,सागरभाई टी महेता खेल कूद प्रदेश प्रमुख,सुरेशभाई बी भोई IT सेल प्रदेश प्रमुख,शंकरभाई बी भोई उत्तर गुजरात प्रमुख, अशोकभाई एम भोई, बिपिनभाई आर महेता पश्चिम गुजरात प्रमुख,अमितभाई पी भोई प्रदेश संगठन मंत्री, विशालभाई राठौड़, चेतनाबेन चुडासा,भवेशभाई जच भोई मध्य गुजरात प्रमुख, संजय बी भोई, संजयभाई के भोई, काडा भाई के भोई, संजयभाई पी भोई, नवनीतलाल भोई, विनोदभाई के भोई, हसमुखभाई भोई,नगीनभाई भोई, अजितभाई के भोई, रशिक भाई भोई, पूजाबेन श्रीमाली, रविभाई श्रीमाली, हरीशभाई पी भोई, मुकेश भाई भोई, भरतभाई भोई पोईचा, मनीषभाई गोहिल, भावेश जेठवा भोई समाज क्रांतिदल सेवा ट्रस्ट गुजरातची संपूर्ण टीम आणि भोई  समाजाचेअनेक कार्यकर्ते आणि देणगीदारांनी देखील हे समाज मंदिर बांधकामासाठी सढळ हाताने मदत केली आहे.या संपूर्ण गुजरात टीम च्या कार्यास मानाचा मुजरा !

रोहितभाऊ शिंगाणे
प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र
भोई समाज सेना
९४२३२८९३३२ /९५४५६७६११८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध