Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १२ जानेवारी, २०२१
चालत्या बसमध्ये २४ वर्षीय तरुणीवर बलात्काराने, महाराष्ट्र हादरला..!
पुणे प्रतिनिधी दिवसेंदिवस बलात्काराच्या घटना वाढत चालल्या असून महाराष्ट्रातही अशा घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत असून अशीच एक घटना महाराष्ट्रात घडली आहे. गोंदियावरुन पुण्याला जाणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे.
याबाबत माहिती अशी की, गोंदियावरुन पुण्याला जाणाऱ्या एका खासगी बस ट्रॅव्हल्समधून २४ वर्षीय तरुणी प्रवास करत होती. ती तरुणी एका सीटवर जाऊन बसली. दरम्यान, आरोपीने ही तुमची सीट नसल्याचे सांगत तुम्ही मागच्या सीटवर जाऊन बसा, असे सांगितले.
पीडिती मागच्या सीटवर जाऊन बसल्यानंतर आरोपींनी तिला चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. तसेच घडलेल्या घटनेची वाच्यता केल्यास चालत्या गाडीतून फेकून देण्याची धमकी आरोपीने पीडितीला दिली. ही घटना ६ जानेवारी रोजी घडल्याचे उघडकीस आले आहे.
परंतु,तरुणीचं मानसिक स्वास्थ खचलं होतं. पीडित तरुणीने पुण्यात पोहोचताच पोलिसांत तक्रार दिल्याने घडलेला सारा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान,पुणे पोलिसांनी वाशिम पोलिसांकडे गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी घडलेल्या घटनेमधील गुडविल्स कंपनीची ट्रॅव्हल्स जप्त केली आहे. तसेच संबंधित आरोपी समीर देवकर असल्याचं पोलिसांनी सांगितले असून याप्रकरणी मालेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
वृत्तसंकलन विभाग नाशिक वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून काजिमाळा, धरमबर्डा, भनवड, देवसाना, करंजखेड,, कापाच...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा