Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
शेगाव नगरपालिका सभापती पदी भाजपचे वर्चस्व बांधकाम पाणीपुरवठा आरोग्य महिला बाल विकास समिती भाजपा कडे शिक्षण समिती शिवसेनेकडे..!
शेगाव नगरपालिका सभापती पदी भाजपचे वर्चस्व बांधकाम पाणीपुरवठा आरोग्य महिला बाल विकास समिती भाजपा कडे शिक्षण समिती शिवसेनेकडे..!
शेगाव प्रतिनिधी: स्थानिक नगरपालिकेच्या अंतर्गत कारभारामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण समजले जाणाऱ्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदाची निवडणूक 21 जानेवारी रोजी पार पडली यामध्ये सार्वजनिक बांधकाम समिती पाणी पुरवठा समिती आरोग्य समिती महिला व बाल विकास समिती या समितीच्या सभापतिपदी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विजयी घोषित झाले तर शिक्षण समिती सभापतीपदी शिवसेनेचे शैलेश डाबेराव यांची निवड करण्यात आली शेगाव नगरपालिकेच्या बांधकाम सभापतिपदी राजेश कलोरे पाणीपुरवठा सभापती पदी पवन महाराज शर्मा आरोग्य सभापती पदी सौ मंगलाताई कमलाकर चव्हाण महिला व बाल विकास समिती सभापतीपदी जय माला देशमुख याप्रमाणे स्थायी समिती सदस्यपदी भारतीय जनता पक्ष नगरसेविका अलकाताई खांजोडे व गंगुबाई खंडारे या दोघांची तर भारिप-बमसंच्या नगरसेविका प्रीती शेगोकार यांची निवड घोषित करण्यात आली मागील चार वर्षापासून शेगाव नगरपालिकेवर भारतीय जनता पक्ष बहुमता मध्ये असल्यामुळे महत्त्वपूर्ण विषय समित्यांच्या सभापती पदावर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहिलेले आहे हे वर्ष नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून शेवटचे वर्ष असल्याने सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या अनेक नगरसेवकांनी विषय समिती सभापती पदावर वर्णी लागावी यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडे बिल्डिंग लावलेली होती.
आज संपन्न झालेल्या विषय समित्यांच्या सभापती पैकी पवन शर्मा ,मंगला चव्हाण व राजेश कलोरे या तिघांना सभापतीपदाची पुन्हा संधी मिळाली तर महिला व बाल विकास समिती सभापतीपदी सौ देशमुख मॅडम व स्थायी समितीवर महिला नगरसेविकांना संधी देऊन भारतीय जनता पक्षाने सर्वच नगरसेवकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केलेला दिसत आहे सभापतीपदाची घोषणा होताच पक्षाच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा गगनभेदी घोषणा देऊन फटाक्यांची जोरदार आतषबाजी सुद्धा केली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष शकुंतला ताई पांडुरंग बूच यांनी नवनिर्वाचित सभापती व सर्व स्थायी समिती सदस्यांचे पुष्पहार घालून सत्कार केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा