Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ८ जानेवारी, २०२१
दारिद्रय आणि शिक्षण...! वाचाल तर टीकाल...!
हा सुविचार आपण नेहमी ऐकत असतो अनेक शाळांमध्ये लिहलेला असतो, पण वाचत कोण? शाळेत येणारी मुले, शिक्षक, पालक..पण काय उपयोग कारण त्याच त्या मुलांना महत्व नसतं, आता नसतंच असही नाहीय कारण पालक मुलांना सांगतात वाचलं का काय लिहलय ते ? मग काय मुल लागतात अभ्यासाला समजुतीसाठी...पण हे सगळं झालं शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी पण त्यांच काय ज्यांनी शाळाच पाहिली नाही,
त्यांना कोण शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारं ? आता ही मुलं किंवा मग त्यांच कुटुंब का शाळा पाहू शकली नाही...कारण त्यांच्या नशिबी आलेलं अठरा विश्व दारिद्र्य.आता गरिबी कशी आली आई - वडील गरिबीत राहतात म्हणजे ते कष्ट करत नाही असं नाही पण येणारा जो थोडाफार पैसा आहे त्याच नियोजन कसं करावं हे त्यांना कळत नाही. आजच्या दिवस खायला भाकरी मिळाली ना..मग बस सुटला त्यांचा प्रश्न उद्याच उद्या बघू.मग शिक्षण हा विषय त्यांच्या चुकूनही डोक्यात येत नाही, पण जर का त्यांना शिकण्याचं महत्त्व समजावून सांगितलं तर? माणूस आहे तो समजून सांगाल तर नक्की कळेल शिक्षण म्हणजे काय आणि त्याची ताकद काय ते...कधी कधी वाटतं ही गरिबी हे ह्या लोकांच्या पदरी पडलेलं दारिद्र्य शाप तर नसेल पण नाही असं नाही हा शाप नसून एखाद्या विशिष्ट समाजाचं एका दुसऱ्या समाजाने म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच केललं खच्चीकरण म्हणजे दारिद्र्य.म्हणजे अमुक समाजाचं हेच काम आहे आणि तेच करावं वैगरे वैगरे शेवटी काय तर आपल्याच लोकांनी त्यांना दिलेला हा शाप आहे.
म्हणून ही लोकं पिढ्यानपिढ्या तसेच राहत आहेत त्यांच्यात कुठलाही बदल होत नाहीय. गरिबी नैसर्गिक नाही तर ती मानवाची निर्मिती आहे.जेव्हा रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीत राहत असलेले कुटुंब पाहते तेव्हा वाटतं हे अपराधी असतील म्हणून तर गरिबीची 'शिक्षा ' भोगत नसतील पण तस नसून गरीब कुटुंबात जन्माला आल्यानंतर त्याच्या पुढील पिढीला देखील हा गरिबीचा वारसा प्राप्त होतो. अनेक झोपड्यांमध्ये छोटी छोटी मुले असतात कुठल्याही साधनाशिवाय कशी राहत असतील ती खूप संस्था आहेत पण गरिब व्यक्ती त्या संस्थे पर्यंत कसा जाणार ना त्यांला तिथे न्याव लागेल ना.. लहान असतानाच त्यांना आरोग्य , शिक्षण ह्या गोष्टी कळायला लागल्या तर ते पण सुधारतील आणि त्यांच कुटुंब पण...मागे मी पाच -दहा मुलांचा गट पहिला ते असेच झोपडी झोपडीत जाऊन मुलांना शिकवतात खूप छान काम करताय त्यावेळी त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद काही वेगळाच असतो.
पण त्याचवेळी जे तरुण मुलं हे कार्य करताय त्यांच्या आई- वडील, नातेवाईक मात्र आपल्याच मुलाची चेष्टा करतात. मित्रांमध्ये मजा करत तर फिरत नाहीय ना.. अरे चांगलच काम करतोय तो का कळत नाही ह्यांना.खूप आदिवासी मुलांसाठी चालू असलेल्या आश्रमशाळा पहिल्यात पण शिक्षकांची मौज असते तिथे ते कधीच मुलांना जबाबदारीने शिकवत नाही, याउलट विचारलं तर म्हणतात की ह्यांना कितीही शिकवलं तरी काही उपयोग नाही , अरे आधी शिकवा तरी . प्रत्येकाने थोडाफार जरी प्रयत्न केला तरी आपण बऱ्यापैकी शिक्षित लोकं घडवू शकू आणि त्यातून एक वेगळाच आनंद मिळवू शकतो आणि तो आनंद कशानेही मोजता न येणारा असणार आहे...
सौ. सोनाली शरद पाटील...!
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा