Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २९ एप्रिल, २०२६

दिंडोरी तालुक्यातील खत विक्री दुकाने आजपासून बंद; कृषी केंद्र चालकांचा संपाचा पवित्रा.




बापू चव्हाण ​दिंडोरी :-

     दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित काळासाठी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी दिंडोरी तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने तालुका अध्यक्ष संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष ललित जाधव, भरत जाधव,योगेश मातेरे,गणेश धुमणे,सुनील पाटील आदी उपस्थित होते.
        ऍग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने पुकारलेल्या बंदच्या निर्णयामुळे ऐन हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषी केंद्र चालकांवर होणारी अन्यायकारक कारवाई, प्रशासकीय जाच आणि विविध तांत्रिक अडचणींच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे.'फर्टिलायझर असोसिएशन'ने या संपाची हाक दिली असून,जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत दुकाने उघडणार नसल्याची भूमिका विक्रेत्यांनी घेतली आहे.कृषी विभागाकडून होणाऱ्या अनावश्यक तपासण्या आणि कारवाईला आळा घालणे.खत विक्रीच्या परवान्यांसंबंधी असलेल्या जाचक अटी शिथिल करणे. खतांसोबत इतर अनावश्यक उत्पादने (लिंकिंग) देण्याऱ्या कंपन्यांच्या सक्तीवर बंदी घालणे. आदी प्रमुख मागण्यासाठी बंद पुकारला आहे. ​सध्या शेती कामांची लगबग सुरू असून खतांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. मात्र, तालुक्यातील सर्व मुख्य बाजारपेठांमधील दुकाने बंद असल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. ऐन वेळी खते मिळाली नाहीत तर पिकांचे नुकसान होईल.प्रशासनाने मध्यस्थी करून हा तिढा लवकरात लवकर सोडवावा.
       अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सतीश देशमुख, तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे,संगम देशमुख यांसह शेतकऱ्यांकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध