Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ७ जानेवारी, २०२१
जामनेरात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन..!
जामनेर प्रतिनिधी:मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त यांना आज दि.६ रोजी जामनेर तालुका पत्रकार असोशियन तर्फे शहरातील नवकार प्लाझा येथील पत्रकार कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
शहरातील प्रथम महिला पत्रकार मिनल चौधरी व जेष्ठ पत्रकार सुरेश महाजन यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
आजच्या काळात पत्रकार क्षेत्रासमोर असलेल्या अडी - अडचणी याविषयी उपस्थितांमध्ये चर्चा करण्यात आली.तर ज्येष्ठ पत्रकार सुरेश महाजन यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनाविषयी सखोल माहिती सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले.तसेच भारतीय जनता पार्टीच्यावतीने आ.गिरीष महाजन यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा साधना महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील,संचालक अॅड.शिवाजी सोनार,भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,उपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील,गटनेते डॉ.प्रशांत भोंडे,नगरसेवक आतिष झाल्टे, सुहास पाटील,दिपक तायडे,राजू चौधरी,ज्ञानेश्वर शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी शहरातील पत्रकारांना भेट वस्तू व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत बाविस्कर,सुत्रसंचलन रविंद्र झाल्टे तर आभारप्रदर्शन आतिष झाल्टे यांनी केले.त्याच प्रमाणे मानवाधिकार संरक्षण समितीतर्फे सुद्धा सत्कार -कोरोना सारख्या महाभयंकर काळात पत्रकारांनी जे योगदान दिले त्याबद्दल मानव अधिकार संरक्षण समितीतर्फे पत्रकारांना कोरोना योध्दा सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
यावेळी मानवाधिकार संरक्षण समितीचे खान्देश जनसंपर्क अधिकारी संतोष पाटील,महिला जिल्हाध्यक्ष स्मिता भिवसने,युवा जिल्हाध्यक्ष योगेश पाटील,
तालुका जनसंपर्क अधिकारी दशरथ पाटील,विवेक म्हस्के आदींसह तालुका पत्रकार असोसिएशनचे तालुकाध्यक्ष अमोल महाजन,उपाध्यक्ष भानुदास चव्हाण, सचिव पंढरीनाथ पाटील,खजिनदार सुनिल नेरकर,सदस्य प्रकाश सैतवाल,रविंद्र झाल्टे,प्रल्हाद सोनवणे,सुहास चौधरी ,सैय्यद लियाकत,किरण सोनवणे,संजय सुर्यवंशी,किरण चौधरी,मिनल शिंदे,प्राजक्ता खरे,ईश्वर चौधरी,बबलू शेख,शेख सुफीयान आदींसह पत्रकार बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा