Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ७ जानेवारी, २०२१

शेगांव पत्रकार संघाच्या वतीने आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन..!



शेगांव प्रतिनिधी:  श्री भास्करराव नंदाने शेगांव दि. 6 जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील नियतकालिक वृत्तपत्र सुरू केले होते त्या वृत्तपत्राची स्मृति म्हणून पत्रकार दिन साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने विश्वनाथ नगर  शेगांव येथे आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर वश्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून पत्रकार दिन शेगांव पत्रकार संघाच्या वतिने साजरा करण्यात आला आहे.
 
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य सदस्य श्री प्रकाश उन्हाळे तर प्रमुख उपस्थिती जेष्ठ पत्रकार भास्करराव नंदाने तसेच जिल्हा पत्रकार संघाचे अनिल उंबरकार यांची उपस्थिती होती या वेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश उन्हाळे यांनी मनोगत व्यक्त केले व पत्रकारांनी एकसंघ राहावे असे आवाहन भास्करराव नंदाने यांनी केले तर या वेळी अध्यक्ष दिनेश महाजन सचिव अमर बोरसे राजकुमार व्यास गुरुदेव गृपचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कुकडे श्री प्रशांत खत्री देवचंद समदुर भास्करराव नंदाने संचीन कडुकार यांच्या सह पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन शेगांव पत्रकार संघाचे सचिव अमर बोरसे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री दिनेश महाजन यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध