Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २० जानेवारी, २०२१
वेल्हाणे निवडणुकीत चांगदेव परिवर्तन पॅनल ने मारली बाजी.
तांडा कुंडाणे (प्रतिनिधी)धुळे तालुक्यातील लक्षवेधी निवडणूक ठरलेल्या वेल्हाणे ग्रामपंचायत निवडणुकीत तीन मातब्बर माजी सरपंचांना धूळ चारत श्री चांगदेव परिवर्तन पॅनल ने 11 पैकी 7 जागा राखत दमदार विजय मिळवला आहे.
श्री चांगदेव परिवर्तन पॅनलचे नेतृत्व राजू दादा पहिलवान, लोटन दादा वाघ, धर्यसिंग पवार, चुडामन मराठे यांनी केले.गावातून सर्वात जास्त मताधिक्क्याने निवडून येण्याचा बहुमान प्रभाग क्रमांक तीन मधील सदस्य शितलताई राजू पाटील यांनी पटकावला आहे.त्या 154 मतांच्या मताधिक्क्याने निवडून आल्या. तर विशेष म्हणजे विद्यमान सरपंच विद्या ताई बोरसे यांना मालुताई अमोल पवार यांनी धूळ चारत 132 च्या मताधिक्क्याने विजय प्राप्त केला आहे.
या विजयाची चर्चा पंचक्रोशीत होत आहे. ग्राम विकास पॅनल ने 11 पैकी 4 जागांवर विजय मिळवला आहे. अशा या चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीकडे संपूर्ण पंचक्रोशीतील लक्ष लागून होते. आता सरपंच सोडती निघण्याची वाट ग्रामस्थ पाहत आहेत.सर्व विजयी उमेदवारांचे गावकऱ्यांनी आनंदात स्वागत केले आहे आणि पराभूत उमेदवारांनी ही मोठ्या मनाने आपला पराभव स्वीकारला आहे.
अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेल्हाणे गावात शांततेच्या वातावरणात संपूर्ण निवडणूक निकाल पार पडला याचा आनंद गावकरी व्यक्त करत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा