Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २० जानेवारी, २०२१

जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्राला जिल्हाधिकारी यांची भेट...!



जामनेर प्रतिनिधी उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथील कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्राला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भेट देऊन लसीकरण संदर्भात आढावा घेऊन कोरणा संशयित रुग्णांच्या तपासणी बाबतही संबंधितांना निर्देश दिले.तसेच लसीकरण वेगाने वाढविण्यासाठी जनतेच्या मनातील भिती दुर होणे आवश्यक असुन,त्यासाठी अधिकारी वर्गाने जनजागृती करावी अशी सुचना ही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी येथे केली.

यावेळी त्यांनी लसीकरणकक्ष व लस सुरक्षा व्यवस्थेची पहाणी करून समाधान व्यक्त केले.याप्रसंगी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ नागोराव चव्हाण,नायब तहसिलदार सुभाष कुंभार, रूग्णालयाचे अधिक्षक डॉ विनय सोनवणे,डॉ आर के पाटील,पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे,तालुका वैद्यकीयअधिकारी राजेश सोनवणे आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध